दरवर्षी 5 हजार नवीन बसेस एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार:एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर, आर्थिक संकटातून बाहेर काढणार – प्रताप सरनाईक दरवर्षी 5 हजार नवीन बसेस एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार:एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर, आर्थिक संकटातून बाहेर काढणार – प्रताप सरनाईक

दरवर्षी 5 हजार नवीन बसेस एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार:एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर, आर्थिक संकटातून बाहेर काढणार – प्रताप सरनाईक

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत एसटी महामंडळाच्या श्वेतपत्रिकेबद्दल माहिती दिली आहे. तसेच एसटी महामंडळाला आर्थिक संकटातून वाचवणार असल्याचे आश्वासन देखील सरनाईक यांनी दिले आहे. दर वर्षाला किमान 10 हजार बसेसची मागणी देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, दर वर्षाला 10 हजार बसेस एसटी महामंडळाच्या ताब्यात आल्या तर जुन्या झालेल्या बसेस पुढल्या 5 वर्षात बाहेर काढता येतील आणि 25-30 हजार बसेसच्या जोरावर आपण चांगल्या प्रकारचे काम पुढे करू शकू, असा प्रस्ताव मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे मांडला आहे. या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून दर वर्षाला 5 हजार बसेस देऊ असे अश्वासन देण्यात आले आहे. एसटी महामंडळ हा लोकांचा विश्वस पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, एसटी महामंडळ हा लोकांचा विश्वस आहे, एसटीवर लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे ही लालपरी सर्वसामन्यांच्या मनात बसली आहे. स्वतःच्या मोठ्या गाड्या असून सुद्धा एसटीने प्रवास करणारी मंडळी या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाची आजची जी स्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडली आहे आणि निश्चितपणे माझ्या कार्यकाळात, सगळ्या या अधिकाऱ्यांना घेऊन एसटी महामंडळ मी ओव्हर कॉन्फिडंसमध्ये असे म्हणणार नाही की फायद्यात घेऊन जाईल, पण तोट्यात नक्कीच घेऊन जाणार नाही, असा विश्वास मला आहे. एसटी महामंडळ आर्थिक संकटातून आम्ही बाहेर काढू दूसरा असा निर्णय मी घेतलेला होता की, एसटी महामंडळाच्या ताफ्यात माझ्या कार्यकाळात मी भाडेतत्वावर बसेस घेणार नाही आणि त्यामुळे भाडेतत्वावर बस ही केवळ ठेकेदाराच्या फायद्यासाठी होते असा आत्तापर्यंतचा इतिहास झालेला आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावर घेण्यापेक्षा माझ्या याच चालकाला, वाहकाला घेऊन मी एसटी महामंडळ पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. गरजच पडली तर 2019 साली काही भरती प्रक्रिया थांबली होती. आता भविष्यात देखील गरज भासली तर भरती प्रक्रिया करता येईल. परंतु, एसटी महामंडळ हे आर्थिक संकटातून आम्ही बाहेर काढू. एसटी महामंडळाच्या श्वेतपत्रिकेत काय म्हटले आहे? एसटी महामंडळाची श्वेत पत्रिका काढण्यात आली आहे. या एसटी महामंडळाच्या खर्च आणि उत्पन्नाचा जमाखर्च मांडण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 5300 इलेक्ट्रीक बसेसचा समावेश करण्यात येणार आहे. सवलतधारी प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड योजना राबवण्यात येणार आहे. तिकीटांसाठी इटीआयएम, ओआरएस प्रकल्प राबवणे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे, कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येणार आहेत. तसेच लांबचा प्रवास करणाऱ्या विना सवलतधारी प्रवाशांना तिकीटदरात सवलत देण्याचीही योजना एसटी महामंडळाच्या विचाराधीन असल्याचे या श्वेतपत्रिकेत म्हटले आहे. महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्वावरील हायटेक व्होल्वो बसेसचा समावेश करणे. महामंडळाच्या जागांवर इंधर पुरवठादार कंपन्यांकडून महसुली भागीदारी तत्वावर खाजगी वाहनांसाठी किरकोळ डिझेल आणि पेट्रोल पंप सुरु करणे. महामंडळाच्या जागांचा बीओटी-पीपीपी तत्वावर विकास करणे, तसेच महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार एलएनजी इंधनाच्या बसेसचा समावेश करणे, महामंडळाच्या ताफ्यात 1 हजार सीएनजी इंधनाच्या बसेसचा अंतर्भाव करणे, या गोष्टींचा श्वेतपत्रिकेत समावेश आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *