कंपनी कर्मचाऱ्यांची सात लाखांची फसवणूक:22.50 टक्क्याने व्याज देण्याचे आमिष देऊन केला फ्रॉड

महिन्याला ठेवींवर २२.५० टक्क्याने व्याज देणाचे आमिष दाखवून एका कंपनी वरीष्ठ अधिकार्याची ७ लाखांची फसवणूक केली. या फसवणुकीप्रकरणी १९ सप्टेंबरला चौघांविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दिपक चव्हाण, संजय चव्हाण, दिपक सोनवणे, शंकर देठे असे या आरोपींचे नावे आहेत. फिर्यादी एकनाथ मारोती सवडे ३१ रा बजाजनगर, हे वाळुज औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत गुणवत्ता निरीक्षक पदावर काम करतात. ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांच्या ओळखीचे दिपक सोनवणे हे त्यांना भेटले. त्यांनी आरडीएम एक्सचेंज या कंपनीविषयी माहिती दिली. त्यानंतर १५ ऑगस्ट २०२३ मोरे चौकात आरडीएम एक्सचेंज च्या कार्यालयात दिपक सोनवणे यांनी सवडेला नेले. कार्यालयात कंपनीचे संचालक दिपक चव्हाण भेटले. आरडीएम ही कंपनी शेअर मार्केटमध्ये ठेवीदारांचे पैसे गुंतवते त्या मिळालेल्या रक्कमेवर समप्रमाणात ठेवीदारांना व्याज देते. त्याच बरोबर कंपनी रिअल इस्टेट, ऑनलाइन शॉपिंगमध्ये सुध्दा गुंतवणुक करत असल्याचे संचालक दिपक चव्हाण यांनी सांगितले. विश्वास संपादनासाठी दिला परतावा सवडे यांनी सुरूवातील कमी रक्कम गुंतवली. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी दिपक चव्हाण याने २२ टक्क्यांनी ठेवींवर व्याज देण्यास सुरूवात केली. त्यानंतर सवडे यांचा विश्वास बसला व त्यांनी पैसे गुंतवले. अनेकांना बसलाय गंडा या फसव्या योजनेत अनेकजण गंडल्या गेले आहेत. सवडे यांनी विश्वास बसल्यानंतर १० लाखांची गुंतवणुक केली. त्यानंतर त्यांना ३ लाख ५१ हजार रूपये परतावा दिला. त्यानंतर कंपनीने कार्यालय बंद करून पैसे देण्यास टाळाटाळ केली.

​महिन्याला ठेवींवर २२.५० टक्क्याने व्याज देणाचे आमिष दाखवून एका कंपनी वरीष्ठ अधिकार्याची ७ लाखांची फसवणूक केली. या फसवणुकीप्रकरणी १९ सप्टेंबरला चौघांविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दिपक चव्हाण, संजय चव्हाण, दिपक सोनवणे, शंकर देठे असे या आरोपींचे नावे आहेत. फिर्यादी एकनाथ मारोती सवडे ३१ रा बजाजनगर, हे वाळुज औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीत गुणवत्ता निरीक्षक पदावर काम करतात. ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांच्या ओळखीचे दिपक सोनवणे हे त्यांना भेटले. त्यांनी आरडीएम एक्सचेंज या कंपनीविषयी माहिती दिली. त्यानंतर १५ ऑगस्ट २०२३ मोरे चौकात आरडीएम एक्सचेंज च्या कार्यालयात दिपक सोनवणे यांनी सवडेला नेले. कार्यालयात कंपनीचे संचालक दिपक चव्हाण भेटले. आरडीएम ही कंपनी शेअर मार्केटमध्ये ठेवीदारांचे पैसे गुंतवते त्या मिळालेल्या रक्कमेवर समप्रमाणात ठेवीदारांना व्याज देते. त्याच बरोबर कंपनी रिअल इस्टेट, ऑनलाइन शॉपिंगमध्ये सुध्दा गुंतवणुक करत असल्याचे संचालक दिपक चव्हाण यांनी सांगितले. विश्वास संपादनासाठी दिला परतावा सवडे यांनी सुरूवातील कमी रक्कम गुंतवली. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी दिपक चव्हाण याने २२ टक्क्यांनी ठेवींवर व्याज देण्यास सुरूवात केली. त्यानंतर सवडे यांचा विश्वास बसला व त्यांनी पैसे गुंतवले. अनेकांना बसलाय गंडा या फसव्या योजनेत अनेकजण गंडल्या गेले आहेत. सवडे यांनी विश्वास बसल्यानंतर १० लाखांची गुंतवणुक केली. त्यानंतर त्यांना ३ लाख ५१ हजार रूपये परतावा दिला. त्यानंतर कंपनीने कार्यालय बंद करून पैसे देण्यास टाळाटाळ केली.  

Share