तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा पोलिस तपास वेगाने होताना दिसत आहे. तामलवाडी पोलिसांनी अलीकडेच सोलापूरमधून भाजप कार्यकर्ता जीवन साळुंकेला अटक केली होती. त्यानंतर आता मिळालेल्या माहितीनुसार, माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर याला देखील ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. वास्तविक तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाची दोषारोपपत्रात संतोष कदमचे नाव समाविष्ट होते. मात्र, त्याला आतापर्यंत अटक करण्यात आली नव्हती. 14 फेब्रुवारी रोजी तामलवाडी येथून 45 ग्रॅम ड्रग्जसह तिघांना ताब्यात घेतल्यानंतर ड्रग्जचे मोठे रॅकेट उघडकीस आले होते. ड्रग्जचे धागेदोरे मुंबई, पुण्यासह सोलापूरपर्यंत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींची संख्या 35 वर गेली असून यापैकी 22 आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. इतर आरोपी अद्याप फरार आहेत. दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात शहरातील अनेक प्रतिष्ठित मागील दोन महिन्यांपासून फरार आहेत. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…