त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीला नातवाने कचऱ्यात फेकले:मुंबईतील अमानुष घटनेने माणुसकीला काळीमा, नातवासह कुटुंबीयांचा शोध सुरू त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीला नातवाने कचऱ्यात फेकले:मुंबईतील अमानुष घटनेने माणुसकीला काळीमा, नातवासह कुटुंबीयांचा शोध सुरू

त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीला नातवाने कचऱ्यात फेकले:मुंबईतील अमानुष घटनेने माणुसकीला काळीमा, नातवासह कुटुंबीयांचा शोध सुरू

मुंबईतील एका नातवाने आपल्या आजीला कचऱ्यात फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्वचेचा कॅन्सर असल्याने नातवाने आजीला कचऱ्यात फेकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने माणुसकीला काळिमा फासला गेला आहे. सध्या या वृद्ध महिलेवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेबद्दल अधिकची माहिती अशी की, मुंबईतील आरे परिसरात असलेल्या काचऱ्याच्या ढिगाऱ्यात एका वृद्ध महिलेला टाकून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. येथील वृद्ध महिलेची चौकशी केली असता घडलेला संपूर्ण प्रकार समजला. यशोदा गायकवाड असे या वृद्ध महिलेचे नाव असून त्यांना त्वचेचा कॅन्सर आहे. याच कारणामुळे नातवाने आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून तो निघून गेला होता. आजीच्या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने नातवाने आपल्या आजीला फेकून दिल्याचे समजते. पोलिसांनी या वृद्ध आजीला ताब्यात घेतल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु दोन रुग्णालयांनी उपचारास नकार दिला होता. अखेर कूपर रुग्णालायला विनंती केल्यानंतर या रुग्णालयात आजीवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. पोलिसांनी आजीची तिच्या घराबद्दल चौकशी केली तेव्हा त्यांनी मालाडमधील घराचा पत्ता दिला. या पत्त्यावर गेल्यावर येथील घाराला कुलूप दिसून आले. आजीच्या कुटुंबाचा शोध सध्या पोलिस घेत आहेत. दरम्यान, या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट उसळली आहे. आजीच्या या नातवार तसेच कुटुंबीयांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या जगात माणुसकी जराशी तरी शिल्लक राहिली आहे की नाही? असा सवाल या घटनेने उपस्थित झाला आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *