एमआयएमचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर येथे आंबेडकरी संघटनांनी मोर्चा काढला. इम्तियाज जलील यांनी ‘हरिजन’ शब्द उच्चारल्याने आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्याचे समजते. या मोर्चावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा शहरात ठिकठिकाणी तैनात करण्यात आला. दरम्यान, या मोर्चाविषयी एका वृत्तवाहिनीशी बोलताना इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इम्तियाज जलील म्हणाले, मी सर्व डॉक्युमेंट्स दाखवले होते, पत्रकार परिषदेत देखील बोललो होतो आणि जेव्हा त्यांना समजले की आपण याचे उत्तर देऊ शकत नाही कारण एवढे ठोस पुरावे माझ्याकडे आहेत. तर यांनी काय केले जे एससी समाजाचे जे नेते आहेत जे स्वयंघोषित आहेत यांनी समाजात असे वातावरण निर्माण केले की इम्तियाज जलील जातीवादी आहे, त्याने अशा शब्दाचा वापर केला म्हणून आमची भावना दुखावली गेली. मी सर्व धर्माचा आदर करतो पुढे बोलताना इम्तियाज जलील म्हणाले, मी 10 वर्ष या शहराचा लोकप्रतिनिधी होतो. आमदार होतो, जिल्ह्याचा खासदार आहे. कोणीही माझ्यावर बोट ठेऊन हे सांगू शकत नाही की मी जातीवाद करतो. कारण मी सर्व धर्माचा आदर करतो. मी आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष आम्ही विधानसभा आणि लोकसभेत सांगितले आहे की या देशात सर्वात मोठा माणूस कोणी जन्माला आला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा गांधी नाही. संजय शिरसाटांवर टीका इम्तियाज जलील म्हणाले, माझ्यावर फक्त आरोप करून विषयाला कसे बाजूला करता येईल आणि संजय शिरसाट यांना मदत कशी होईल यासाठी हे सगळे नाटक सुरू आहेत. तीन दिवसापूर्वी त्यांची पत्रकार परिषद होती. त्यावेळी संजय शिरसाट म्हणाले होते की इम्तियाज जलील यांनी जे बोलले आहे ते नाही विचारले तरच मी बसणार इथे. तेव्हा पत्रकारांनी म्हटले हो आम्ही नाही विचारात. तुम्ही तिथे पत्रकारिता दाखवा, त्यांना प्रश्न विचारून दाखवा. प्रश्न विचारला असता तर ते उठून जातानाचे रेकॉर्ड करायला पाहिजे होते. माझे नाव ऐकून ते रात्री पण उठतात आता. स्वप्नात येतो मी, इम्तियाज जलील आता उद्या कोणती पत्रकार परिषद घेणार आहे. घेणार आहे एक दोन दिवसात. खूप मोठी पत्रकार परिषद असणार आहे. भाजपचेही लोक रस्त्यावर उतरले इम्तियाज जलील यांच्या विरोधात निघालेल्या मोर्चाला उद्देशून बोलताना ते म्हणाले, हे जे लोक जमले आहेत 300 रुपये घेऊन यांना वाटत असेल की आपण एवढा मोठा मोर्चा काढला आहे, एवढ्या गाड्या काढल्या आहेत. आज मला दिसून आले की भाजपचेही लोक रस्त्यावर उतरले आहेत. फक्त संजय शिरसाटचेच लोक नाही आहेत या मोर्चामध्ये आहेत.