विधिमंडळ अधिवेशन – दुसरा दिवस:शक्तिपीठ महामार्गाविरोधात विरोधकांची घोषणाबाजी; भास्कर जाधव यांची नीतेश राणेंवर टीका विधिमंडळ अधिवेशन – दुसरा दिवस:शक्तिपीठ महामार्गाविरोधात विरोधकांची घोषणाबाजी; भास्कर जाधव यांची नीतेश राणेंवर टीका

विधिमंडळ अधिवेशन – दुसरा दिवस:शक्तिपीठ महामार्गाविरोधात विरोधकांची घोषणाबाजी; भास्कर जाधव यांची नीतेश राणेंवर टीका

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दूसरा दिवस. आज विरोधक शक्तिपीठ महामार्गावरून सरकारला घेरू शकतात. तसेच ज्या जिल्ह्यांमधून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे, त्या भागातील शेतकरी व स्थानिक आंदोलन करणार असल्याची माहिती आहे. तसेच बीडमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या मुद्दा सभागृहात व बाहेर देखील तापण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या मुंब्रा येथे झालेल्या लोकल अपघाताचा देखील प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. विधानभवन परिसरात विरोधी पक्षांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत असून जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या. हातात फलक घेऊन हे आंदोलन करण्यात आले. विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधकांनी आंदोलन केले. गजनी सरकार, विसरभोळा कारभार असे रोहित पवारांकडून विधानभवन परिसरात बॅनरबाजी करण्यात आली. रोहित पवार म्हणाले, आज विधिमंडळात कृषी दिन साजरा केला जाणार आहे. पण हे जे गजनी सरकार आहे, विसरभोळा कारभार अशी यांची परिस्थिती आहे. सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांनी जाहीर केले होते की आम्ही 7-12 करू. पण ती फक्त घोषणाच राहिली, त्यावर काहीही झाले नाही. तसेच सन्मान निधी 3 हजार वाढ करू, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीक विमा, कशी मदत करणार आहे याबद्दल सरकारने सांगितले नाही.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *