विधानसभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून 50 हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. भास्कर जाधव म्हणाले, मे महिन्यात अवेळी पाऊस पडला. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेले आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 14 मे पासून रोजच पाऊस सुरू झाला. या पावसाने मोठी दाणादाण उडवली आहे. मराठवाड्यातील व विदर्भातील 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही आकडेवारी जानेवारी ते मार्च पर्यंतच्या आहेत. वर्षभरात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मागच्या निवडणुकीच्या वेळी त्यांना आश्वासने दिली होती. आम्ही सात बारा कोरा करू असे सांगण्यात आले. पण आता हे सरकार म्हणत आहे कर्जमाफी करू, पण योग्यवेळी करू. लाडक्या बहिणींना म्हणाले 2100 रुपये देणार, नाही दिले. हे आश्वासने केवळ निवडणुकीपुरते होते. नुकसानभरपाई म्हणून 50 हजार रुपयांची मदत करावी पर हेक्टरी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून किमान 50000 रुपयांची तात्काळ मदत करण्याची गरज आहे. पंचनामे झालेले नाहीत. ऑनलाइन पद्धतीने पंचनामे केले जात आहेत, पण त्या ठिकाणी नेटवर्कच नसेल तर काय करणार? शेतकऱ्यांना माहिती देणे गरजेचे आहे. ऑफलाइन पद्धतीने देखील पंचनामे केले जावेत, अशी माझी मागणी आहे. शेतकऱ्यांचे कर्जमाफी केले जावे, सौरऊर्जा प्रकल्प मोफत देण्यात यावे, किती जणांकडे आहे सौरऊर्जा प्रकल्प? एक रुपयात पिकविमा ही योजना फसवी ठरली. शेतकऱ्यांची चेष्टा केली जाते शेतकऱ्यांची चेष्टा केली जात आहे. कृषिमंत्री स्वतः टिंगल टवाळी करतात, कर्जमाफीच्या पैशातून काय मुली बाळांचे लग्न करायचे आहेत का? असे त्यांनी म्हटले होते. शेतकऱ्यांनी असे स्वप्न कधी बघू नये का? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. आजकाल भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयांत पिकविमा दिला, असेही विधान कृषिमंत्र्यांनी केले होते. ती योजनाच रद्द झाली. तुमच्या काय ढेकळाचा पंचनामा करायचा का? असेही ते म्हणाले, असे कोणी शेतकऱ्यांना म्हणू शकते का? पण हा सत्तेचा माज आहे. भास्कर जाधव म्हणाले, बबनराव लोणीकर म्हणतात तुमच्या आईच्या अंगावरचं पातळ माझ्या बापामुळे येतात. तुमच्या अंगावरचे कपडे माझ्या बापामुळे येतात. 2014 पूर्वी सरकार नव्हते का? ही लोकशाही आहे. कोणाचा उपमर्द करण्याचा अधिकार कोणी दिला? माणसाचा मोठेपणा तेव्हाच असतो जेव्हा त्याच्याकडे नम्रता असते. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील नाते कसे असले पाहिजे, जेव्हा आम्ही सत्तेत होतो, कॉंग्रेस सत्तेत होती, तेव्हा विरोधी पक्षातील लोक अश्लाघ्य भाषेत बोलायचे आणि आम्ही ऐकून घेत होतो. आता हे सरकार एक शब्द सुद्धा ऐकून घेत नाहीत.