देवेंद्र फडणवीस सरांचा क्लास:वाचाळवीर, कंत्राटदार आमदारांचे धरले कान; विरोधकांच्या हाती आयते कोलीत न देण्याची सक्त ताकीद देवेंद्र फडणवीस सरांचा क्लास:वाचाळवीर, कंत्राटदार आमदारांचे धरले कान; विरोधकांच्या हाती आयते कोलीत न देण्याची सक्त ताकीद

देवेंद्र फडणवीस सरांचा क्लास:वाचाळवीर, कंत्राटदार आमदारांचे धरले कान; विरोधकांच्या हाती आयते कोलीत न देण्याची सक्त ताकीद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्नेह भोजनाच्या निमित्ताने महायुतीमधील वाचाळवीर आणि कंत्राट घेणाऱ्या आमदारांचे चांगलेच कान धरले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्याच्या मागे लागू नका, असा सल्ला देखील दिला. सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आणि अशा काळात विरोधकांच्या हाती आयते कोलीत न देण्याची सक्त ताकीद देखील फडणवीस यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे संस्कार हे वेगळे आहेत. त्यानुसारच पुढे जा, विकासाची कामे करताना आपल्या मतदारसंघाचे हित कशात आहे, त्याचा विचार करूनच ती कामे करा. असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना दिला आहे. सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स मिळवण्याच्या मागे लागू नका. सरकारच्या विरोधात फेक नरेटिव्हच्या मुद्द्यावरूनही त्यांनी आमदारांना कान मंत्री दिला. विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह तयार करायच्या आधीच सरकारच्या आणि पक्षाच्या बाजूने नॅरेटिव्ह तयार करा, असा सल्ला देखील फडणवीस यांनी आमदारांना दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी आमदारांच्या स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेह भोजनासाठी महायुती मधील आमदार आणि मंत्र्यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. यादरम्यान गेल्या काही काळात वाचाळवीर ठरलेल्या आमदार आणि मंत्र्यांचे देखील कान मुख्यमंत्र्यांनी खेचले. महायुतीच्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य टाळण्याचा सल्ला यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. नेत्यांमध्ये वाद होईल, असे वक्तव्य कोणीही करू नये यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात महायुतीच्या आमदार आणि मंत्र्यांनाही वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्याची माहिती दिली. महायुतीतील नेत्यांमधील वाद होईल, असे कोणतेही वक्तव्य कोणीही करू नये. एखादे वादग्रस्त वक्तव्य करून पावसाळी अधिवेशन सुरू असताना विरोधकांच्या हाती आयते कोलीत कोणी देऊ नका, अशी सक्त ताकीद देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील आमदार आणि मंत्र्यांना दिली आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. महायुतीमधील महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला निश्चित आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आता महायुतीमधील महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला देखील निश्चित झाला आहे. त्यानुसार सर्वाधिक आमदार असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वाटेला सर्वाधिक 48% पदे येणार आहेत. शिवसेनेच्या वाटेला 29 टक्के तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला 23 टक्के महामंडळे येणार आहेत. पूर्ण बातमी वाचा….

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *