उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन हिंदी विरोधात आवाज उठवला. त्यामुळे मराठीचा विजय शक्य झाला असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे उद्याच्या मेळाव्यासाठी आमचे नेते आणि मनसेचे नेते एकत्र तयारी करत असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. उद्याचा दिवस ऐतिहासिक असेल. त्यामुळे राजकारणात नवा बदल घडवणारा दिवस असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. हिंदीच्या विरोधात ठाकरेंनी मराठीला विजय मिळवून दिला, असा दावा देखील त्यांनी केला आहे. या मेळाव्या मुळे शिवसेना सोडून गेलेल्या जुन्या सहकाऱ्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठला आहे. त्यामुळे नैराश्यातून त्यांची वायफळ वक्तव्ये समोर येत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. रामदास कदम, एकनाथ शिंदे किंवा इतर शिंदे गटातील नेते काय बोलतात? हे सुरूच राहणार आहे. मराठी माणूस उद्धव आणि राज ठाकरे यांच्या निमित्ताने एकत्र आला असला तरी 5-25 टाळक्यांना ते एकत्र आलेले नको आहे. विशेष करून शिंदे गटाच्या लोकांचे राजकीय भविष्य संपणार आहे. या भीतीपोटी त्याना अशा कल्पना सुचत आहेत, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. या लढाईत त्या प्रत्येकाचे योगदान उद्या होणाऱ्या मराठी मेळाव्याची संपूर्ण रूपरेषा ठरलेली आहे. ती ठरलेली रूपरेषा आम्ही आता सांगितली तर उद्या लोकांनी कार्यक्रमाला का यावे? कार्यक्रमाला जे येतील त्या लोकांचे स्वागत होईल. त्यात काँग्रेसचे नेते असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, डाव्या पक्षाचे नेते असतील, प्रत्येकाचे सन्मानाने स्वागत करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या लढाईत त्या प्रत्येकाचे योगदान आहे, हे आम्ही मान्य करू, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. गिरीश महाजन यांच्यावरही गंभीर आरोप नाशिक मधील प्रवेश थांबावे यासाठी मी माझे मत व्यक्त केले नाही. मी केवळ भारतीय जनता पक्षाचा बुरखा फाडण्याचे काम केले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. नाशिक मधील एका व्यक्तीने समाज माध्यमावर शिवसेनेच्या नेत्यांवर विरोधात गरज ओळखण्याचा प्रयत्न केला. पोलिस त्या संदर्भात दखल घेत नव्हते. ती व्यक्ती ब्लॅकमेल करत होती. त्यामुळे शिवसैनिकांनी त्यांच्या कानशिलात मारली. मात्र, गिरीश महाजन यांनी गुंड लोकांच्या मदतीने पक्ष प्रवेश करुन घेतले असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. महाजन यांची अनेक प्रकरणे माझ्याकडे आहेत. ती लवकरच समोर आणणार असल्याचा दावा देखील राऊत यांनी केला आहे.