राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र हैं क्या?:यांच्यासारख्या गुंडांची जागा तुरुंगात, देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा; भाजप नेत्याचा हल्लाबोल राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र हैं क्या?:यांच्यासारख्या गुंडांची जागा तुरुंगात, देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा; भाजप नेत्याचा हल्लाबोल

राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र हैं क्या?:यांच्यासारख्या गुंडांची जागा तुरुंगात, देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा; भाजप नेत्याचा हल्लाबोल

राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र हैं क्या? अशा शब्दांत भाजप प्रवक्ते नवीन जिंदाल यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वाद थांबायचे नाव घेत नाहीये. मुंबईत अमराठी व्यक्तीला मारहाण केल्यानंतर हिंदी भाषिकांनी राज ठाकरे व मनसैनिकांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यात उद्योजक सुशील केडिया यांनी ट्विट करत मराठी शिकणार नसल्याचे म्हणत राज ठाकरेंना आव्हान केले. आता नवीन जिंदाल यांनी निशाणा साधला आहे. राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र है क्या? नवीन जिंदाल यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र है क्या? असे म्हटले आहे. तसेच राज ठाकरेंसारख्या सडकछाप गुंडाची जागा तुरुंगात आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा, असे ट्विट करत टीका केली आहे. राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी मुंबईतील शांतिदूतांना मराठी भाषा बोलायला लावावी, असे आव्हान जिंदाल यांनी केले आहे. मी मराठी शिकणार नाही – सुशील केडिया दरम्यान, शेअर मार्केटमधील उद्योजक सुशील केडिया यांनी ट्विट करत राज ठाकरे यांना आव्हान केले आहे. त्यांनी ट्विट करत असे लिहिले की, मुंबईत 30 वर्षे राहूनही मला मराठी नीट येत नाही आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी असा निश्चय केला आहे की जोपर्यंत तुमच्यासारख्या लोक मराठी माणसाची काळजी घेण्याचे नाटक करत आहेत तोपर्यंत मी प्रतिज्ञा घेतो की मी मराठी शिकणार नाही. काय करायचे बोल? असे म्हणत त्यांनी थेट राज ठाकरेंना आव्हान केले आहे. ठाकरे बंधू येणार एकत्र दरम्यान, राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा जीआर मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे दोन्ही नेते उद्या विजयी मेळाव्यासाठी एकत्र येणार आहेत. उद्या एकत्रीत विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. याची संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागलेली आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *