भाषणात उल्लेख राहून गेला, राज ठाकरेंनी व्यक्त केली दिलगिरी:म्हणाले- ‘त्या सर्वांचे अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार’ भाषणात उल्लेख राहून गेला, राज ठाकरेंनी व्यक्त केली दिलगिरी:म्हणाले- ‘त्या सर्वांचे अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार’

भाषणात उल्लेख राहून गेला, राज ठाकरेंनी व्यक्त केली दिलगिरी:म्हणाले- ‘त्या सर्वांचे अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार’

हिंदी सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वरळी डोम मध्ये एकत्र मेळावा घेतला. या मेळाव्यात सुरुवातीला राज ठाकरे यांनी तर नंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. मात्र, राज ठाकरे यांनी आपल्याकडून भाषणात उल्लेख राहून गेला, असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच मनापासून आभार देखील मानले आहेत. यासाठी राज ठाकरे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हिंदी सक्तीच्या विरोधात राज्यात दबावगट तयार झाला. या दबाव गटामुळेच राज्य सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला. या सर्वात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रे, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबाव गट, तसेच मोजके कलाकार हे या लढ्यात ठामपणे उभे राहिले. या सर्वांचे आपण अभिनंदन करत असून आभार मानत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील, असा विश्वास देखील राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा… हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार. मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो. – राज ठाकरे भाषणातही सरकारला सुनावले राज ठाकरे म्हणाले की, मी एक पत्र लिहले, दुसरे लिहले मग दादा भुसे माझ्याकडे आले. मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो समजून घ्या. ऐकूण घ्या. म्हटले दादा तुम्हाला एक सांगतो तुम्ही काय सांगता ते ऐकूण घेईल पण ऐकणार नाही. त्रिभाषा सूत्र हे केवळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील दूवा म्हणून आणण्यात आले. आज सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात इंग्रजी आहे तिथे हे सूत्र नाही. केंद्रीय शैक्षणिक धोरणातही हे सूत्र नाही.इतर कोणत्या राज्यात ही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करुण पाहिला. दक्षिणेतील राज्य तर यांना विचारतही नाही. पण महाराष्ट्र पेटून उठला की काय होते हे सत्ताधाऱ्यांना दिसले असेल. त्याशिवाय का माघार घेतली.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *