मुख्यमंत्री देवेंद्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक आज पहाटे अडीच वाजता विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पॉडकास्ट एक मालिका सुरू केली आहे. यात बोलताना त्यांनी वारीच्या इतिहासावर तसेच महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीबद्दल भाष्य केले आहे. महाराष्ट्राची कहाणी सुरू होते देवाच्या पावलांनी देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हा महाराष्ट्र का आहे, याचे उत्तर शोधायला आपल्याला मागे जावे लागेल. महाराष्ट्राची कहाणी सुरू होते देवाच्या पावलांनी. रामायणात याचा उल्लेख आहे. श्रीराम वनवासात असताना दंडकअरण्यात प्रवेश केला. आजच्या विदर्भात आणि नाशिकच्या भागात घनदाट जंगलांचा विस्तार होता. पंचवटी सर्वज्ञात असा परिसर. रामायणातल्या जीवंत भूगोलातला भाग आहे. हेच ते ठिकाण जिथे लक्ष्मणाने लक्ष्मण रेषा काढली आणि साधूच्या वेशात रावण आला, सीतामाईला घेऊन गेला. धर्म-अधर्मचा संघर्ष तीव्र झाला तो इथेच. सत्याचा जय होत असतो हे आपण सांगत आलो आहोत. महाभारतात सुद्धा महाराष्ट्राचीच भूमी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाभारतात सुद्धा महाराष्ट्राचीच भूमी आहे. विदर्भ हा तो भाग आहे, जिथे दमयंतीची गोष्ट घडली. कोकणातील गुहांमध्ये अर्जुन ध्यानाला बसला, असे लोककथांमध्ये सांगितले जाते. त्याला दिव्यास्त्र प्राप्त करायचे होते. महाभारतातल्या रमणीय कथेचा भाग बनतो तोही विदर्भातच. राजकन्या रुख्मिणी पत्र लिहिते कृष्णाला आणि ते पत्र वाचताच तो धावत येतो कौंढण्यपुरात. आजची तरुण मुलं मेल करतात प्रेमाचे, पण कित्येक शतकापूर्वी अशा प्रकारे अतिशय विशुद्ध प्रेमाने आणि वाहून घेतलेल्या रुख्मिणीने ते पत्र पाठवले. लगेच कृष्ण तिथे पोहोचतात आणि तिला घेऊन जातात. हे विदर्भाच्या भूमीत घडले आहे. महाराष्ट्राने गौतम बुद्धांचे शब्द जपले पांडव अज्ञातवासात राहिले ते चिखलदऱ्यात. जुलमी राजवट किचकाची ती उधळून लावली निर्धन पांडवांनी. असत्यावर सत्याने मिळवलेली विजयाची रोमहर्षक कहाणी आहे. म्हणजे महाराष्ट्राची भूमी पुरणांमध्ये आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भगवान बुद्धही महाराष्ट्राच्या भूमीत शांततेत पोहोचले. त्यांचे शब्द इथे पोहोचेल. अजिंठाच्या लेणीत बौद्ध भिक्षुकांनी बुद्धांचे शब्द दगडात कोरून ठेवले आहेत. एका राजकुमाराच्या कथा ज्याने शांतीसाठी सर्वकाही सोडले आणि जगाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला. महाराष्ट्राने गौतम बुद्धांचे शब्द फक्त ऐकले नाहीत तर त्यांना जपले गुफांमध्ये, स्मृतींमध्ये आणि आतम्यातही. आजही जेव्हा तुम्ही त्या प्राचीन भिंती समोर उभे राहता तेव्हा असे वाटते की गौतम बुद्ध अजूनही हलकेच बोलत आहेत. कोल्हापूरमध्ये साक्षात महालक्ष्मीचा निवास देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातल्या दैवी उर्जेमुळे इथे सत्याचा, विश्वाचा शोध घेणारे साधक, संत आणि विचारवंत आले आणि रमले. शंकराचार्य अवघ्या 8 व्या वर्षी घर सोडून भारतभर फिरले. त्यांचे महत्त्वाचे पीठ त्यांनी इथेच स्थापन केले. करवीर म्हणजे आजचे कोल्हापूर जिथे साक्षात महालक्ष्मीचा निवास आहे. महाराष्ट्र हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा एक दुवा आहे. तो दैवी प्रवासाचा अंतिम मुक्काम आहे. पुढे जर मातीनेच बोलायला सुरुवात केली ती संतांच्या माध्यमातून. 13 व्या शतकात चक्रधर स्वामींनी स्थापन केलेला महानुभाव पंथ जातीपातीला सरळ नाकारणारा हा पंथ होता. त्यांची शिकवण साधी होती, मराठीत लिहिलेली. ते केवळ भक्ती शिकवत नव्हते, तर जीवनशैली आणि न्याय देखील शिकवत होते. वारी सामाजिक समतेचा झरा नम्रता आणि श्रद्धेवर आधारित वारीची परंपरा आली. जगात क्वचितच अशी यात्रा घडत असेल जी प्रतिवर्षी न चुकता, भक्तीवर आधारित असलेली वारी सामाजिक समतेचा झरा बनली. वारीला जाती नाही. एक मेकांना भेटतात आणि एकच गजर पाऊल पडतात एकत्र, भक्ती आणि विठ्ठल. संत ज्ञानेश्वरांनी दिली ज्ञानेश्वरी, गीतेचे मराठीत भाष्य अवघ्या किशोर वयात लिहिले. पसायदान ही जागतिक संस्कृतीतील सर्वोत्तम प्रार्थना. त्यांचे थोरले संत निवृत्तीनाथ, नाथ परंपरेचे पाईक. त्यांची बहीण मुक्ताबाई, या जगावेगळ्या भवांची बहीण जिच्या ओव्या समाजाला प्रश्न विचारण्याची ताकद देत. संत शस्त्र हाती न घेणारे योद्धे संत नामदेव ज्यांच्या रचना गुरुग्रंथ साहिबमध्ये सापडतात. संत एकनाथ ज्यांच्या अभंगांनी करुणा आणि नैतिकतेचा झरा वाहिला. संत चोखामेळा, मंदिरात प्रवेश नाही मिळाला, पण कडवटपणा न बाळगता विठ्ठल भक्ती करणारे संत, आज त्यांची समाधी पंढरपूरच्या मंदिराच्या दारात आहे. हे संत केवळ उपदेशक नव्हते ते भक्तीचे लोकशाहीकरण करणारे शस्त्र हाती न घेणारे योद्धे होते.