त्रिपुरा आता पूर्ण साक्षर राज्य; 2,228 युवांच्या सेवेचे फळ:मिझोराम, गोव्यानंतर 23 जूनला त्रिपुरा तिसरे साक्षर राज्य, लोकसहभागावर आधारित चळवळीने घडवली क्रांती

त्रिपुराच्या २,२२८ तरुणांनी मानधन किंवा प्रसिद्धीशिवाय त्रिपुराला देशातील तिसरे पूर्ण साक्षर राज्य बनवले. त्यांनी गावोगावी निरक्षरांची ओळख पटवली. नंतर लोकांच्या सोयीनुसार त्यांना शिकवण्यास सुरुवात केली. शेतातून किंवा बाजारातून परतल्यानंतर दररोज संध्याकाळी स्वयंसेवक त्यांना शिकवण्यासाठी जात असत. कधी एखाद्याच्या घरी, कधी अंगणवाडीत तर कधी स्थानिक बाजारात. शिक्षणाचे माध्यम बंगाली, कोकबोरोक आणि इंग्रजी होते. हालाम आणि रियांग आदिवासी भाषांमध्येही सामग्री तयार केली जात होती. ऑडिओ-व्हिज्युअल वापरला जात होता. अभ्यासाचा साप्ताहिक आढावा घेण्यात येत होता. हे तरुण दीक्षा पोर्टल आणि व्हॉट्सअॅपद्वारे त्यांच्या विद्यार्थ्यांशी सतत जोडलेले राहिले. राज्य साक्षरता अभियानाचे नोडल अधिकारी सिद्धार्थ शंकर रॉय म्हणाले- त्रिपुराची पूर्ण साक्षरता ही सरकारी आदेशाने सुरू झालेली चळवळ नव्हे तर लोकसहभागावर आधारित एक जिवंत प्रक्रिया होती. २३ जून रोजी त्रिपुराला पूर्ण राज्य घोषित केले. २०११ च्या जनगणनेनुसार ८७.२२ टक्के लोक साक्षर होते. आता ९५.६ टक्के आहे. पारावर वर्ग, मोबाइलमध्ये मिशन… साक्षरतेची मूक चळवळ एक उदाहरण
सहभागी स्वयंसेवक कोण?
या उपक्रमाशी संबंधित २,२२८ स्वयंसेवकांमध्ये शिक्षक, विद्यार्थी, निवृत्त कर्मचारी, पंचायत सदस्य आणि स्वयंसहायता गटातील महिलांचा समावेश होता.
निवड कशी केली?
पंचायत, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि सामाजिक संघटनांनी स्थानिक बोलीभाषा जाणणाऱ्या १०वी उत्तीर्ण तरुणांची निवड केली. त्यांची साक्षरता समन्वयकांनी पडताळणी केली. त्यांना ३ दिवसांचे प्रशिक्षण दिले.
जीवन कसे बदलले?
गंगानगर जिल्ह्यातील अँपी गावातील प्रफुल्ल जमातिया आता त्यांचे पीक विकताना सगळा हिशेब स्वतः करतात. खोवाई जिल्ह्यातील ५८ वर्षीय मिलन बीबी म्हणाल्या, आता मी माझ्या नातवासोबत पुस्तके वाचू शकते.
शिकवण्याची पद्धत काय?
समोरासमोर शिकवणे अधिक प्रभावी होते. लोक लहान गटात अभ्यास करून लवकर वाचायला आणि लिहायला शिकले. आता ते बँक फॉर्म, रेशन कार्ड किंवा योजना फॉर्म स्वतः भरू शकतात. बैठकांतविचार मांडत आहेत.
कसे तयार झाले?
सर्वप्रथम आम्ही गावातील २-३ लोकांना तयार केले. अभ्यास करताना पाहून इतरही आले.
सरकारने लक्ष्य कधी ठेवले?
राज्य सरकारने २०२२ च्या शेवटच्या महिन्यांत हा प्राथमिक कार्यक्रम घोषित केला.
अंतिम टप्प्यात साक्षर किती?
अंतिम टप्प्यात २४,६७२ जणांना साक्षर केले. त्यापैकी २३,३०९ जणांनी एफएलएमएटी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. जागरूक आणि सक्षम होण्यास शिकवले राज्यातील लोकांना केवळ स्वाक्षरी करायला शिकवले नाही तर संपूर्ण समाजाला जागरूक आणि सक्षम होण्यास शिकवले आहे. -माणिक साहा, मुख्यमंत्री, त्रिपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *