गुगल विशाखापट्टणम येथे आशियातील सर्वात मोठे डेटा सेंटर उभारणार आहे. ते गीगावॉट क्षमतेचे असेल. रॉयटर्सच्या माहितीनुसार, गुगल यामध्ये ५० हजार कोटी रुपये गुंतवणार आहे. यापैकी १६ हजार कोटी रुपये नवीकरणीय ऊर्जा सुविधांसाठी वापरले जातील, जे डेटा सेंटरला वीजपुरवठा करतील. हा गुगलचा भारतातील अशा प्रकारचा पहिला मोठा प्रकल्प असेल. एप्रिलमध्ये, गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने सांगितले होते की ते यावर्षी जगभरातील डेटा सेंटरची क्षमता वाढवण्यासाठी ६.२५ लाख कोटी रुपये खर्च करतील. आंध्र प्रदेशचे आयटी मंत्री नारा लोकेश यांनी सांगितले की, विशाखापट्टणममध्ये ३ केबल लँडिंग स्टेशन देखील तयार केले जातील, ज्यामुळे उच्च-गती डेटा हस्तांतरण शक्य होईल. राज्यात १.६ गिगावॉट क्षमतेच्या डेटा सेंटर गुंतवणुकीला अंतिम रूप देण्यात आले आहे. पुढील ५ वर्षांत ६ गिगावॉट क्षमतेची डेटा सेंटर तयार करण्याचे लक्ष्य आहे. सध्या देशभरात एकूण १.४ गिगावॉट क्षमतेची डेटा सेंटर कार्यरत आहेत.
एआयवर विश्वास : भारत ५ वर्षांत बनवेल ८७ हजार कोटींची सायबर सुरक्षा कंपनी बंगळुरू | भारताने २०३० पर्यंत १० अब्ज डॉलर्सची पहिली सायबर सुरक्षा कंपनी तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी, देश एआय-आधारित संशाेधन व नवाेक्रमात गुंतवणूक करत आहे, जेणेकरून भारतीय स्टार्टअप्स अमेरिका आणि इस्रायलच्या महाकाय कंपन्यांना मागे टाकू शकतील. एक्सेल व्हेंचर कॅपिटलचे भागीदार प्रयंक स्वरूप यांच्या मते, भारतातील अनेक माजी तंत्रज्ञान अधिकारी एआय-संचालित सायबर सुरक्षा स्टार्टअप्स सुरू करत आहेत, जे करारांमध्ये अमेरिकन निधीप्राप्त कंपन्यांना मागे टाकत आहेत. अलीकडेच त्यांनी आयआयटी दिल्ली आणि मुंबई येथील अनुभवी उद्योजकांशी चर्चा केली, ज्यांनी अमेरिकेत ४ सायबर सुरक्षा कंपन्या तयार करून विकल्या.


By
mahahunt
1 August 2025