चोरीचा माल परत केला म्हणजे चोर सुटत नसतो:गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणी वाढल्या; अनिल परब यांचा इशारा चोरीचा माल परत केला म्हणजे चोर सुटत नसतो:गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणी वाढल्या; अनिल परब यांचा इशारा

चोरीचा माल परत केला म्हणजे चोर सुटत नसतो:गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणी वाढल्या; अनिल परब यांचा इशारा

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या अडचणी वाढत आहेत. विधान परिषदेचे सदस्य आणि उद्धव सेनेचे नेते अनिल परब यांनी राज्यमंत्री कदम यांच्यावर लावलेल्या आरोपांशी संबंधित पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. गृह राज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्स बार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, त्यानंतर आता कदम यांच्या या बारमधील ऑर्केस्ट्राचा परवाना परत जमा करण्यात आला आहे. चोराने चोरीचा माल परत केला म्हणजे तो सुटत नसतो. तर त्या ठिकाणी चोरी झाली हे सिद्ध होत असल्याचे परब यांनी म्हटले आहे. यावरुन कदम यांच्या राजीनाम्याची मागणी देखील परब यांनी केली आहे. कदम यांच्या बारचा परवाना परत केला याचा अर्थ या प्रकरणातून त्यांची सुटका होत नाही. परवाना परत केला म्हणजेच त्यांच्या बार मध्ये अवैध काम चालू होते, हे त्यांनी मान्य केले आहे. जर त्यांच्याकडे वैद्य काम चालू असते तर त्यांनी परवाना परत करण्याचे काय कारण होते? असा प्रश्न परब यांनी विचारला आहे. माझ्याकडे ऑर्केस्ट्रा चालतो असे सुरुवातीपासून ते सांगत होते. जर व्यवस्थित कायद्याच्या आधारे काम चालू होते, तर त्यांनी परवाना का परत केला? असा प्रश्न परब यांनी विचारला आहे. या प्रकरणात चोराने आपल्याकडील चोरीचा माल परत दिला आहे. मात्र, तरी त्यांची यातून सुटका होणार नाही. कायद्याने गुन्हा घडला आहे. ज्या गोष्टीला महाराष्ट्रामध्ये बंदी घातलेली होती. ती त्यांच्या घरात सुरू होती. विशेष म्हणजे बंदी घालण्याची जबाबदारी गृह राज्यमंत्र्यांवर होती. त्यामुळे याच्यातून गृह राज्यमंत्र्यांची सुटका होऊ शकत नाही, असा इशारा देखील परब यांनी दिला आहे. गृह राज्यमंत्र्यांवर कारवाई करावी पावसाळी अधिवेशनात अनिल परब यांनी विधान परिषदेत राज्यमंत्री कदम यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. परब यांनी त्या आरोपांशी संबंधित पुरावे मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना परब म्हणाले होते की, आम्ही केलेल्या आरोपांचे सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना सादर केले आहेत. आम्ही मुख्यमंत्र्यांनी पुरावे तपासावे आणि गृह राज्यमंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. डान्स बारवर अनेक वेळा छापे टाकण्यात आले विधान परिषदेतील उद्धव सेनेचे सदस्य अनिल परब म्हणाले होते की, गृह राज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने चालणाऱ्या डान्स बारवर 2023 ते 2025 दरम्यान अनेक वेळा छापे टाकण्यात आले. अलिकडच्या छाप्यात 22 बार गर्ल्स, 22 ग्राहक आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आली. त्यांच्यावर पुन्हा गुन्हेगार म्हणून नोंद करण्यात आली आहे. कायद्यानुसार, डान्स बारशी संबंधित कोणत्याही गैर प्रकारासाठी मूळ मालक जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *