मंत्रिमंडळात कितीही पत्ते पिसले तरी डाग पुसले जाणार नाहीत:कलंकित मंत्र्यांना जावेच लागणार; खासदार संजय राऊत यांचा दावा मंत्रिमंडळात कितीही पत्ते पिसले तरी डाग पुसले जाणार नाहीत:कलंकित मंत्र्यांना जावेच लागणार; खासदार संजय राऊत यांचा दावा

मंत्रिमंडळात कितीही पत्ते पिसले तरी डाग पुसले जाणार नाहीत:कलंकित मंत्र्यांना जावेच लागणार; खासदार संजय राऊत यांचा दावा

सरकार मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार तसा प्रयत्न करत राहील. मात्र, सरकारने कितीही रंगसफेदी करण्याचा प्रयत्न केला तरी सरकारची कलंकित झाले आहे. महाराष्ट्राला डाग लागला आहे. तो अशा प्रकारच्या मंत्रिमंडळातील पत्ते पिसल्यामुळे तो डाग पुसला जाणार नाही. त्यामुळे मंत्र्यांना जावेच लागेल, असे मी खात्रीने सांगत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राज्यातील सहा ते सात मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागतील, असा दावा राऊत यांनी केला होता. मात्र, मंत्री मंडळामध्ये केवळ दोन मंत्र्यांचे खाते बदल करण्यात आले आहेत. यावरुन राऊत यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका केली आहे. राज्यातील कलंकित मंत्र्यांना जावेच लागणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या विषयी राऊत म्हणाले की, वसईच्या आयुक्तांवर पडलेली धाड हे 1000 कोटींचे प्रकरण आहे. त्यात देखील एका मंत्र्याला जावे लागेल. तसेच आता जे नवीन क्रीडा मंत्री आहेत. वास्तविक त्यांना आता योग्य खाते मिळाले आहे. ही देखील तात्पुरती व्यवस्था आहे. प्रत्येक आरोपी शेवटपर्यंत स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करत असतो. देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्या भेटीमध्ये काय सांगितले? हे मला माहिती असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. फडणवीसांनी शहांना देखील सांगितले कोकाटे यांच्यावर झालेली कारवाई ही थातूरमातूर आहे. वास्तविक आरोपी मंत्री आणि त्यांचे नेते आपापल्या माणसांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याचा जनतेच्या आणि विरोधी पक्षाच्या मतावरती काहीही परिणाम होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांना देखील हेच करायचे आहे. दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना देखील तसे सांगितले आहे. अशा लोकांबरोबर मला काम करणे अवघड झाले असल्याचे फडणवीस यांनी शहांना सांगितले आहे. त्यामुळे याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे त्यांनी शहा यांना सांगितले आहे. सरकार आणि राज्याची यामुळे बदनामी होत असल्याचे फडणवीस शहांना म्हणाले असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *