माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू आणि जेडीएसचा माजी खासदार प्रज्वल रेवण्णाला बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने बलात्काराच्या आरोपात दोषी ठरवले. निकालानंतर तो रडत कोर्टाबाहेर आला. शनिवारी न्यायाधीश संतोष गजानन भट शिक्षा सुनावतील. ४८ वर्षीय मोलकरणीने प्रज्वलवर बलात्काराचा आरोप केलेल्या चार प्रकरणांपैकी हा पहिलाच खटला आहे. माजी खासदाराने २०२१ मध्ये हासन आणि बंगळुरू येथील फार्महाऊसमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मोलकरणीने केला आहे. रेवण्णाने केवळ अत्याचार केला नाही तर संपूर्ण कृत्याचा व्हिडिओही केला. तो सर्वात मोठा पुरावा ठरला. न्यायालयाने पीडितेची साक्ष, डिजिटल फॉरेन्सिक अहवाल निर्णायक मानला. ७० पीडितांची ओळख पटली, रेवण्णाचे २९०० हून अधिक व्हिडिओ समोर आले


By
mahahunt
2 August 2025