उद्योगधंद्यासाठी जमिनी मागण्यासाठी शेतकऱ्यांकडे कंपनीचे लोक आले तर शेतकऱ्यांनी नुसते जमिनी विकू नये, तर जेवढे शेतकरी आहेत, तेवढ्या शेतकऱ्यांना कंपनीमध्ये पार्टनर बनवून घेण्याची मागणी करा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. या वेळी त्यांनी मराठीच्या मुद्यावरून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उद्योगधंद्यासाठी जमिनी मागण्यासाठी लोक आले तर शेतकऱ्यांनी नुसत्या जमिनी विकू नये. तर जेवढे शेतकरी आहेत, तेवढ्या शेतकऱ्यांना कंपनीमध्ये पार्टनर बनवून घेण्याची मागणी करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. त्या उद्योगांमध्ये आमची मुले तर कामाला लागतीलच. मात्र, फुकटच्या जमिनी न देता कंपनीमध्ये पार्टनर आम्हाला करा, अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी करावी. असे आवाहन त्यांनी केले आहे. जमिनी एकदा हातातून गेल्या तर आपल्या हातात काहीही राहणार नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसे झाले नाही तर याच रायगड मध्ये लवकरच अमराठी नगरसेवक, आमदार, खासदार निवडून येतील, अशी भीती देखील राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ठाणे जिल्ह्याला अमराठी लोकांचा विळखा पडला असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे . मुख्यमंत्री मुलांना हिंदी कशी शिकवता येईल? याचा विचार करतोय महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रातील लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल? याचा विचार करतोय. महाराष्ट्रात येणाऱ्या हिंदी भाषिकांना मराठी कशी येईल? याचा विचार मुख्यमंत्र्यांच्या मनात नाही. महाराष्ट्राचा मराठी माणूस, महाराष्ट्राचा भूमिपुत्र याचा विचारच होत नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. याचे सर्वात विदारक आणि भीषण स्वरूप रायगड जिल्ह्यात दिसून येत असल्याचे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…