अर्बन नक्षली म्हणून अटक करून दाखवाच, असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्यावरून फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. जो कायद्याने राहतो, त्याला अटक करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र, कायदा न वाचता आलेली ही कॉमेंट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तुम्ही अर्बन नक्षली सारखे वागाल तर तुम्हालाही अटक होईल, अशा शब्दात फडणवीसांनी सुनावले आहे. तुम्ही एखाद्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकते. त्यासाठी तुम्हाला अर्बन नक्षली ठरवण्यात येत आहे. मात्र, मराठी माणसाच्या थडग्यावर तुम्हाला उद्योग उभे करू देणार नाही. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा सन्मान ठेवावाच लागेल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. एखाद्याला अर्बन नक्षली म्हणून अटक करून दाखवाच, असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. यावरुन फडणवीस यांनी राज ठाकरे यांना प्रत्यु्त्तर दिले आहे. नेमके काय म्हणाले राज ठाकरे राज्य सरकारने नवीन कायदा आणला आहे. तुम्ही कोण तर म्हणे शहरांमध्ये राहणारे नक्षली. तुम्ही जर एखाद्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकते. मात्र, एकदा अटक करून दाखवाच, असे आव्हान राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग उभे राहू देणार नाही. उद्योग आणायचे असेल तर मराठी माणसाचा मानसन्मान ठेवूनच ते उद्योग महाराष्ट्रात आणावे लागतील. त्याशिवाय तुम्हाला ते आणता येणार नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर राज ठाकरे यांच्या या आव्हानाला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी त्यांना का अटक करू? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे. हा कायदा न वाचता अशी टीका केली जात असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तुम्ही जर अर्बन लक्षली सारखे वागत नाही, त्यामुळे तुम्हाला अटक कराण्याचा प्रश्नच येत नाही. जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील, त्यांच्याकरता तो कायदा तयार झाला आहे. आंदोलकांविरुद्ध कायदा नाही. सरकार विरुद्ध बोलायची यामध्ये पूर्णपणे मुभा आहे. त्यामुळे कायदा न वाचता केलेली ही काँमेंट असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.