संजय राऊत यांचे सरन्यायाधीशांना पत्र:तेलंगणातील आमदारांच्या पक्षांतर प्रकरणात केले अभिनंदन; पक्षांतराचा प्रश्न पुन्हा अधोरेखित संजय राऊत यांचे सरन्यायाधीशांना पत्र:तेलंगणातील आमदारांच्या पक्षांतर प्रकरणात केले अभिनंदन; पक्षांतराचा प्रश्न पुन्हा अधोरेखित

संजय राऊत यांचे सरन्यायाधीशांना पत्र:तेलंगणातील आमदारांच्या पक्षांतर प्रकरणात केले अभिनंदन; पक्षांतराचा प्रश्न पुन्हा अधोरेखित

उद्धव ठाकरे यांच्या गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी तेलंगणा तील आमदारांच्या बाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिलेल्या निर्णयामुळे अंधारात ढकललेल्या लोकशाहीला आशेचा किरण दिसला असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी सरन्यायाधीश भूषण गवळी यांना पत्र पाठवले आहे. इतकेच नाही तर त्या सोबत दैनिक सामना मध्ये याच विषयावर लिहिलेला अग्रलेख देखील त्यांनी सरन्यायाधीशांना पाठवला आहे. या महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या लोकभावना असल्याचा दावा, संजय राऊत यांनी आपल्या पत्रात केला आहे. महाराष्ट्रातील आमदारांच्या पक्षांतरावर विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयावर ठाकरे गटाचा आक्षेप आहे. राऊत यांनी या माध्यमातून शिवसेनेतील आमदारांच्या पक्षांतराचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे. संजय राऊत यांनी लिहिलेले पत्र देखील वाचा… सन्माननीय श्री. भूषण गवईजी
जय महाराष्ट्र!
आपले विशेष अभिनंदन करण्यासाठी हे पत्र लिहीत आहे. तेलंगणातील १० आमदारांच्या पक्षांतर प्रकरणात आपल्या खंडपीठाने परखड मत व्यक्त केले. मूळ राजकीय पक्षाशी बेइमानी करून पक्षांतर करणाऱ्यांना रोखले नाही तर लोकशाहीचे नुकसान होईल. विधानसभेचे अध्यक्ष ही राजकीय व्यक्ती असल्याने ते बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रक्रिया लांबवतात हे आपले निरीक्षण अंधारात ढकललेल्या लोकशाहीला आशेचे किरण दाखवणारे आहे त्याबद्दल आपले अभिनंदन. मा. सरन्यायाधीश साहेब, आज रोजी (२ ऑगस्ट २०२५) दैनिक सामना’त प्रसिद्ध झालेला याच विषयावरील अग्रलेख (‘जे बोललात ते करा!’) आपल्या अवलोकनार्थ पाठवीत आहे. अग्रलेखातील भावना या महाराष्ट्राच्या नव्हे, तर देशाच्या लोकभावना आहेत. तसदीबद्दल क्षमस्व! कळावे.
आपला नम्र,
संजय राऊत

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *