‘मी कृतज्ञ आहे माझ्या सासऱ्यांसाठी.. ज्यांनी मला सून नव्हे, मुलगी समजले. मी कृतज्ञ आहे, वर्तमानपत्र पोहोचवणाऱ्या हॉकरसाठी, ज्याने थंडी, ऊन, पावसात वर्तमानपत्र आमच्यापर्यंत पोहोचवले. त्याच्या आधी पहिल्या व्यक्तीची ज्याने वर्तमानपत्राबाबत विचार केला. ते प्रिंट केले. आपल्याला घरी बसून जगभरातील माहिती मिळते… ’ हे शब्द आहेत उज्जैनच्या ४३ वर्षीय लीना वर्मा यांनी लिहिलेल्या डायरीतील.. त्यांनी २२ एप्रिल रोजी हातात महाकालचे चित्र आणि सतत ओम नम: शिवायचा जप करत या जगाचा निरोप घेतला. त्यांना डायरी लिहिण्याची सवय.. या जगाला अलविदा म्हणण्याआधीही त्यांनी आपल्या भावना लिहून ठेवल्या. डायरीत त्यांनी आपल्यावर २ वर्षे डायलिसिस करणारे डॉक्टर, नर्स आणि वॉर्ड बॉयचेही आभार मानले. पती संजय सांगतात, ती म्हणायची की- अाता माझी जबाबदारी संपली. आता तुम्ही आणि मुले. ५-६ महिन्यांपासून पीटीएममध्येही गेल्या नाहीत. शिक्षक विचारू लागले. दोन्ही मुलांनी काय सांगायचे? एक ऑगस्टला त्यांचा जन्मदिवस. संजय सांगतात, ती जिवंत असती तर ४३ वर्षांची झाली असती. आता फक्त तिच्या आठवणी उरल्या. त्यांच्या डायरीतील लिखाणात कृतज्ञ भावना ओतप्रोत आहेत. घर, पूजास्थळ, अंगण सुने-सुने करून त्या गेल्या. जीवनात नेहमी कृतज्ञ भावना ठेवा. संकट मोठे वाटणार नाही. श्वासाचे मोजमाप झाले. प्रत्येकाचा आनंद घ्या, हा संदेश मागे ठेवून… २०१२ मध्ये मूत्रपिंडाचा आजार, २०२३ पासून डायलिसिस सुरू
२०१२ मध्ये लीना यांना मूत्रपिंडाचा आजार उद्भवला. २०२३ पासून डायलिसिस सुरू झाले. दोन वर्षे सारे काही सुरळीत सुरू होते. २१ एप्रिलला आलेल्या कार्डियाक अरेस्टने सारे काही बदलून गेले. एमआरआय केल्यानंतर कळले की, आर्टीजमध्ये लिकेज झाले आहे. मे २००३ मध्ये लीना यांचा विवाह संजय यांच्याशी झाला. लीना यांनी संस्कृतमध्ये एमए केले होते. दोन मुले आहेत, पार्थ आणि रुद्राक्ष. कोविडच्या आधीपर्यंत दोघांची शाळेत १०० टक्के हजेरी.


By
mahahunt
4 August 2025