आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत युती बाबत अद्याप थोडी प्रतीक्षा करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, 20 वर्षांनंतर आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्ही का भांडता? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मतभेद मिटवून एकत्र येण्याच्या सूचना सर्वांना केल्या आहेत. या मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत युती बाबत योग्य वेळी सांगेल. युतीचे काय करायचे? ते माझ्यावर सोड. मात्र, आपापसातील मतभेद मिटवा आणि कामाला लागा, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. इतकेच नाही तर मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा, ते करत असताना हिंदी भाषिकांचा द्वेष करु नका, अशा सूचना देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. कोणालाही न घाबरता आत्मविश्वासाने काम करा. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त होतील, त्यांना स्वीकारा, असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी केले आहे. वीस वर्षानंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग तुम्ही का भांडता? असा प्रश्न देखील राज ठाकरे यांनी विचारला आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत मनसे 100 टक्के सत्तेत येणार असल्याचा दावा देखील राज ठाकरे यांनी केला. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…