मेघना बोर्डीकरांचा बेताल वक्तव्यांचा भडिमार सुरू:सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर, म्हणाल्या – संजय शिरसाटांची बहीण शोभून दिसतात मेघना बोर्डीकरांचा बेताल वक्तव्यांचा भडिमार सुरू:सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर, म्हणाल्या – संजय शिरसाटांची बहीण शोभून दिसतात

मेघना बोर्डीकरांचा बेताल वक्तव्यांचा भडिमार सुरू:सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर, म्हणाल्या – संजय शिरसाटांची बहीण शोभून दिसतात

परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका ग्रामसेवकाला धमकावल्याचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या प्रकारावर अजूनही टीका सुरू असतानाच, आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बोर्डीकर यांचा आणखी एक व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी शेअर केलेल्या नव्या व्हिडिओमध्ये मेघना बोर्डीकर एका कार्यक्रमात बोलताना म्हणतात, “कुणाच्या घरी गोड बातमी असेल, तर ती सुद्धा आमच्यामुळे असेल, असंही आता काही लोक म्हणतील.” याच विधानावरून अंधारे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, सोशल मीडियावर “बेताल वक्तव्यांचा भडिमार करणाऱ्या मेघना बोर्डीकर या संजय शिरसाट यांची बहीणच शोभून दिसतात,” अशा शब्दांत त्यांनी टोला लगावला आहे. सुषमा अंधारे काय म्हणाल्या? सुषमा अंधारे यांनी मेघना बोर्डीकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, महाराष्ट्र आता काही थांबत नाही… मेघना बोर्डीकरांचा बेताल वक्तव्यांचा भडीमार सुरू आहे…”कुणाच्या घरी गोड बातमी असेल तर ती सुद्धा आमच्याच मुळे.. असेही आता काही लोक म्हणतील..” इति मेघना बोर्डीकर. बोर्डीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा सिलसिला बघता या शिरसाठची बहीण शोभून दिसतात, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, हा व्हिडीओ नेमका कोणत्या कार्यक्रमातील आहे आणि केव्हा शूट करण्यात आला, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या व्हिडिओमुळे मेघना बोर्डीकर पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारमध्ये बेताल वक्तव्यांची शर्यत? दरम्यान, राज्यातील महायुती सरकारमधील काही मंत्री आणि आमदार सातत्याने केलेल्या बेताल वक्तव्यांमुळे सरकार अडचणीत सापडले आहे. नीतेश राणे, संजय शिरसाट, परिणय फुके, आणि आता मेघना बोर्डीकर यांची वक्तव्ये सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी “विचारपूर्वक बोला, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल,” असा इशारा दिला होता. मात्र प्रत्यक्षात मंत्री आणि आमदार मुख्यमंत्री फडणवीसांचेही ऐकत नसल्याचे दिसून येत आहे. यावरून सरकारमध्ये मंत्री आणि आमदारांमध्ये बेताल वक्तव्यांची शर्यत सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे ही वाचा… माझा तो राग लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी होता:धमकीच्या व्हिडिओवर मेघना बोर्डीकरांचे स्पष्टीकरण, रोहित पवारांवरही साधला निशाणा परभणीच्या पालकमंत्री एका शासकीय कार्यक्रमात ग्रामसेवकावर संतापल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. मेघना बोर्डीकर यांनी ग्रामसेवकाला कानाखाली अशी भाषा वापरल्याचे व्हिडिओत दिसून आले. या व्हिडिओवरून मेघना बोर्डीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझा तो राग माझ्या लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी होता, असे स्पष्टीकर मेघना बोर्डीकर यांनी दिले असून, आमदार रोहित पवार यांना टोलाही लगावला आहे. सविस्तर वाचा…

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *