महादेव मुंडेंना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले?:तपास थांबवायला का सांगितला? सुशील कराडच्या दाव्यावर ज्ञानेश्वरी मुंडेंचा सवाल महादेव मुंडेंना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले?:तपास थांबवायला का सांगितला? सुशील कराडच्या दाव्यावर ज्ञानेश्वरी मुंडेंचा सवाल

महादेव मुंडेंना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले?:तपास थांबवायला का सांगितला? सुशील कराडच्या दाव्यावर ज्ञानेश्वरी मुंडेंचा सवाल

बीडच्या महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा हात असल्याचा आरोप बाळा बांगर यांनी केला होता. तसेच वाल्मीक कराडची मुलं सुद्धा या हाटीएत सहभागी असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. परंतु, कराडचा मुलगा सुशील कराडने हे सर्व आरोप फेटाळून लावत आपण महादेव मुंडे यांना ओळखच नव्हतो, असा दावा केला आहे. त्यांनी केलेल्या या दाव्यावर आता महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाले, तुम्ही जर महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले. मी पहिल्यापासून सानप यांच्या सीडीआरची मागणी करत आहे. तसेच भास्कर केंद्रे यांचेही सीडीआर काढण्यात यावे अशी माझी मागणी आहे. ठाकूर यांच्यासहित डीवायएसपी कविता नेहरकर यांचाही सीडीआर काढण्यात यावा. डीवायएसपी चोरमले पीआय यांच्यासमोर मला गोविंद यलमाटे म्हणाले की, ‘मला बंगल्याहून फोन आला तपास थांबवा. ओळख नव्हते तर मग तपास का थांबवला? असा सवाल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला आहे. ताईच्या नावाने मी फ्लॅट करतो मीडिया ट्रायल बंद करा पुढे बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, मी माझ्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, त्यांनी काय करावं ते त्यांनी ठरवावे. सुप्रिया ताईंनी देशासमोर मागणी केली आहे की या प्रकरणात सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे. जेव्हा मी आणि माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये होतो, तेव्हा माझ्या वडिलांकडे एक व्यक्ती आला त्यांनी सांगितलं, ताईच्या नावाने मी फ्लॅट करतो मीडिया ट्रायल बंद करा. तसेच या व्यक्तीचे नाव मी पंकज कुमावत साहेबांना सांगणार आहे, असेही ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या. सुशील भैय्या, मी व माझे वडील आणि मध्यस्थी आम्ही सोबत बसून तपास करणार आहोत की या मध्यस्थीचा काही प्लॅन होता का? मुख्यमंत्र्यांना आम्ही नाव सांगितले आहे. यांची एवढी दहशत आहे की हे मध्यस्थाला पण काहीही करू शकतात, अशी भीती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली आहे. परळी येथे एपीआय असलेले दहिफळे यांचे प्रमोशन शिरसाळा येथे झाले त्यावेळी खुद्द गोट्या गित्तेने त्यांचा सत्कार केला होता. जे खरोखर आरोपी आहेत त्यांनाच कडक शासन झाले पाहिजे. जेव्हा मी या प्रकरणात खोलात गेले तेव्हा मला आरोपीचे नाव निष्पन्न झाले. पोलिस अधिकारी सकपाळ यांनी या आरोपीचे नंबर माझ्या भावाकडे दिले होते असेही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटले होते. महादेव मुंडेंना आम्ही ओळखत नव्हतो – सुशील कराड वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराडने म्हटले होते की, महादेव मुंडे हत्या प्रकरणात होत असलेले आरोप खोटे आहेत. महादेव मुंडेंना आम्ही कधीही ओळखत नव्हतो. ना मी त्यांना कधी पाहिले होते, ना माझ्या भावाने त्यांना कधी पाहिले होते तसेच ना माझ्या वडिलांनी त्यांना कधी पाहिले होते, असा दावा सुशील कराडने केला आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *