आरती साठेंकडे आम्हाला न्याय मिळेल का? त्यांची नियुक्त रद्द करा:आमदार रोहित पवार यांची सरन्यायाधीश यांच्याकडे मागणी आरती साठेंकडे आम्हाला न्याय मिळेल का? त्यांची नियुक्त रद्द करा:आमदार रोहित पवार यांची सरन्यायाधीश यांच्याकडे मागणी

आरती साठेंकडे आम्हाला न्याय मिळेल का? त्यांची नियुक्त रद्द करा:आमदार रोहित पवार यांची सरन्यायाधीश यांच्याकडे मागणी

आरती साठे यांच्या नियुक्ती जज म्हणून झाली तर आमची केस अशा न्यायाधीशांकडे गेल्यास न्याय मिळेल का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. पूर्वी अशा नियुक्त्या झाल्या असल्याचा दाखला दिला जातो. मात्र, आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नसल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे आरती साठे यांची न्यायाधीश म्हणून नाव वगळावे, अशी आमची मागणी असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. आरती साठे या भाजपच्या प्रवक्ता होत्या, एक खेळाडू होत्या. काही लोक जुने दाखले देत आहेत. पूर्वीच्या काळी अशा नियुक्त्या होत होत्या. मात्र, त्यावेळी भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतला होता का? अटल बिहारी वाजपेयी विरोधी पक्ष नेते होते. त्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता का? त्यावेळी त्यांना ती नियुक्ती योग्य वाटली असेल त्यामुळे त्यांनी आक्षेप घेतला नसेल. मात्र, आता आम्ही सर्व विरोधक त्याला विरोध करत आहोत. त्यामुळे आरती साठे यांचे नाव सरन्यायाधीशांनी वगळावे, अशी आमची विनंती असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संदर्भातला निकाल गेल्या अनेक वर्षांपासून अद्याप लागलेला नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निर्णयाबाबत देखील उशीर केला जात आहे. न्याय देण्यास उशीर झाला तर मुद्दामून उशीर केला जात असल्याची शंका निर्माण होते. मात्र, ज्यावेळी अशा पद्धतीचा उशीर होतो त्यावेळी मनामध्ये शंका येत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहेत. अशा शंका आजपर्यंत कोणीही न्यायव्यवस्थेवर घेतलेल्या नव्हत्या. मात्र, परिस्थिती पाहता आज अशा शंका उपस्थित होत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. सरकारने साठे यांच्या नियुक्ती बाबत योग्य निर्णय घ्यावा 2014 – 15 नंतर अशा अनेक नियुक्त्या आहेत ज्या वादग्रस्त ठरल्या आहेत. त्यामुळे हे सर्व बघितल्यानंतर मनामध्ये शंका येते, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे. उज्वल निकम देखील सरकारी वकील आहेत आणि दुसरीकडे राज्यसभेचे सदस्य देखील आहेत. त्यांना राज्यसभेचे सदस्यपद मिळाल्याबद्दल अभिनंदन. मात्र ते सरकारची बाजू मांडत असताना लोक त्यांच्यावर शंका घेतील. अशा शंका उपस्थित केल्या गेल्या तर ते फार घातक ठरू शकते. त्यामुळे सरकारने साठे यांच्या नियुक्ती बाबत योग्य तो निर्णय घेण्याची आमची मागणी असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *