​​​​​​​सोमय्या पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील:पक्ष कुणाला विचारून एखादे पद किंवा आमदारकी देत नाही -बावनकुळे

​​​​​​​सोमय्या पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील:पक्ष कुणाला विचारून एखादे पद किंवा आमदारकी देत नाही -बावनकुळे

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पक्षाने विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुखपदाची दिलेली जबाबदारी पेलण्यास नकार दिल्यामुळे भाजपमधील असंतोष प्रकर्षाने पुढे आला आहे. पण आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमय्या पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करून सोमय्या यांना पक्षादेश पाळावाच लागेल असे स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच सत्ताधारी महायुतीतील धुसफूस प्रचंड प्रमाणात वाढली आहे. भाजपने किरीट सोमय्या यांची विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली होती. पण किरीट सोमय्या यांनी स्पष्ट शब्दांत हे पद नाकारले आहे. त्यामुळे ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी एका पत्राद्वारे आपला निर्णय भाजपच्या राज्यातील नेतृत्वासह निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्ष माजी खासदार रावसाहेब दानवे यांना कळवला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजप कुणालाही विचारून जबाबदारी देत नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, माजी खासदार किरीट सोमय्या हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पण पक्षाचे नेतृत्व हे कुणाला विचारून एखादे पद किंवा जबाबदारी देत नाही. याविषयी तसा नियमही नाही. कुणाला आमदारकी द्यायची असेल तरीही पक्ष विचारत नाही. मला स्वतःला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देताना विचारण्यात आले नव्हते. केवळ तुम्ही काम करा असे सांगण्यात आले. शेवटी पक्षाचा एक प्लॅटफॉर्म आहे. त्या अनुषंगाने किरीट सोमय्या यांना पक्षाने जबाबदारी दिली. त्यानुसार ते त्यांना देण्यात आलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील. काय म्हणाले होते किरीट सोमय्या? किरीट सोमय्या निवडणूक संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी फेटाळताना म्हणाले होते की, पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीच्या सदस्यपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी महाराष्ट्र भाजपाचे आभार मानतो. मात्र मी हे पद स्वीकारण्यास असमर्थ आहे, त्याबद्दल खेद व्यक्त करतो. मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितलं आहे की गेल्या साडेपाच वर्षांपासून मी भाजपाचा सामान्य सदस्य म्हणून काम करत आहे. तेच काम यापुढेही चालू ठेवेन. मात्र, मी प्रचार समितीत सहभागी होणार नाही. आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, हे मला अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी, असे सोमय्या आपल्या पत्रात म्हणाले होते.

​भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पक्षाने विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुखपदाची दिलेली जबाबदारी पेलण्यास नकार दिल्यामुळे भाजपमधील असंतोष प्रकर्षाने पुढे आला आहे. पण आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमय्या पक्षाने दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करून सोमय्या यांना पक्षादेश पाळावाच लागेल असे स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच सत्ताधारी महायुतीतील धुसफूस प्रचंड प्रमाणात वाढली आहे. भाजपने किरीट सोमय्या यांची विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली होती. पण किरीट सोमय्या यांनी स्पष्ट शब्दांत हे पद नाकारले आहे. त्यामुळे ते पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी एका पत्राद्वारे आपला निर्णय भाजपच्या राज्यातील नेतृत्वासह निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्ष माजी खासदार रावसाहेब दानवे यांना कळवला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली आहे. भाजप कुणालाही विचारून जबाबदारी देत नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, माजी खासदार किरीट सोमय्या हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पण पक्षाचे नेतृत्व हे कुणाला विचारून एखादे पद किंवा जबाबदारी देत नाही. याविषयी तसा नियमही नाही. कुणाला आमदारकी द्यायची असेल तरीही पक्ष विचारत नाही. मला स्वतःला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देताना विचारण्यात आले नव्हते. केवळ तुम्ही काम करा असे सांगण्यात आले. शेवटी पक्षाचा एक प्लॅटफॉर्म आहे. त्या अनुषंगाने किरीट सोमय्या यांना पक्षाने जबाबदारी दिली. त्यानुसार ते त्यांना देण्यात आलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील. काय म्हणाले होते किरीट सोमय्या? किरीट सोमय्या निवडणूक संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी फेटाळताना म्हणाले होते की, पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीच्या सदस्यपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी महाराष्ट्र भाजपाचे आभार मानतो. मात्र मी हे पद स्वीकारण्यास असमर्थ आहे, त्याबद्दल खेद व्यक्त करतो. मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितलं आहे की गेल्या साडेपाच वर्षांपासून मी भाजपाचा सामान्य सदस्य म्हणून काम करत आहे. तेच काम यापुढेही चालू ठेवेन. मात्र, मी प्रचार समितीत सहभागी होणार नाही. आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, हे मला अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी, असे सोमय्या आपल्या पत्रात म्हणाले होते.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment