मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून 31 हजार कर्ज प्रकरणे मंजूर:मराठवाड्यातील 3600 प्रकरणांचा समावेश, चर्चासत्रात बी. टी. यशवंते यांची माहिती

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून 31 हजार कर्ज प्रकरणे मंजूर:मराठवाड्यातील 3600 प्रकरणांचा समावेश, चर्चासत्रात बी. टी. यशवंते यांची माहिती

जिल्हा उद्योग केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि सार्वांगीण प्रगतीवर भर दिला जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून ३१ हजार कर्ज प्रकरणांना मंजुरी दिली आहे. मराठवाड्यातील ३६०० आणि त्यात छत्रपती संभाजीनगरातील १२०० कर्ज प्रकरणांचा समावेश आहे. अशी माहिती उद्योग विभागाचे सहसंचालक बी. टी. यशवंते यांनी चर्चासत्रात बोलताना दिली. तसेच १८ ते ४५ वयोगतील उद्योजकांनी या योजनेचा फायदा घेतला पाहिजे. यामध्ये राज्य सरकारतर्फे समाजातील विविध घटकांना १५ ते ३५ % पर्यंत अनुदान मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षणातून उद्योगाचे धडे विभागात उद्योजगतेचे बीज रोवण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यामार्फत ८ ते १२ दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे. बीज मुद्रा योजनेत प्राथमिक कर्ज दिले जाते. ज्यामुळे लहान उद्योग सुरू करता येतात. उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करणारे जिल्हा उद्योग मित्र काम करतात. मैत्री पोर्टलच्या माध्यमातून परवाने आणि विविध सेवांसाठी ११९ सेवा उपलब्ध आहेत. हे सर्व उपाय योजनाबद्धपणे उद्योग वाढवण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आहेत, अशी माहिती यशवंते यांनी दिली. सिडबीच्या सर्वसमावेशक योजना सिडबीचे उपमहाव्यवस्थापक मनोज सहयोगी म्हणाले की सिडबीने उद्योगाच्या वित्तपुरवठ्यासाठी विशेष योजना तयार केलेल्या आहेत. नवीन उद्योगांसाठी तसेच विद्यमान उद्योगांच्या विस्तारासाठी कर्जे उपलब्ध आहेत. उद्योगांना आवश्यक असलेल्या यंत्रसामग्रीसाठी सिडबी डिजिटल कर्ज योजना प्रस्तावित करते. या अंतर्गत उद्योगांना तात्काळ आणि सुलभपणे कर्ज मिळवता येते, ज्यामुळे उत्पादन क्षमता वाढवणे शक्य होते. सिडबी ग्रीन फायनान्स योजनेंतर्गत पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी कर्ज उपलब्ध करून देते. या योजनेंतर्गत, नवीकरणीय ऊर्जा, ऊर्जा बचत, आणि इतर टिकाऊ उपाययोजनांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचा उद्देश सांगतांना सीए श्वेता भारतीया म्हणल्या या प्रकारच्या कार्यक्रमांचा उद्देश महिला उद्योजकांना सक्षमीकरण करणे आणि त्यांना स्पर्धात्मक बाजारात टिकून राहण्यासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करणे आहे,” आम्ही स्थानिक उद्योजकांना समर्थन देण्यासाठी व त्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक संसाधनांपर्यंत पोहचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. सीएमआयए महिला सेल तर्फे आगामी काळात गुंतवणूक, निर्यात, आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रीला समोर ठेवून आणि मऱाठवाड्यात महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महिला सेलच्या प्रमुख उत्कर्षा पाटील यांनी सांगितले. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (सीएमआयए) ने महिला उद्योजक आणि एमएसएमईसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी सीएमआयए अध्यक्ष अर्पित सावे, मानद सचिव अथर्वेशराज नंदावत, महिला सेलच्या प्रमुख उत्कर्षा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

​जिल्हा उद्योग केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि सार्वांगीण प्रगतीवर भर दिला जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून ३१ हजार कर्ज प्रकरणांना मंजुरी दिली आहे. मराठवाड्यातील ३६०० आणि त्यात छत्रपती संभाजीनगरातील १२०० कर्ज प्रकरणांचा समावेश आहे. अशी माहिती उद्योग विभागाचे सहसंचालक बी. टी. यशवंते यांनी चर्चासत्रात बोलताना दिली. तसेच १८ ते ४५ वयोगतील उद्योजकांनी या योजनेचा फायदा घेतला पाहिजे. यामध्ये राज्य सरकारतर्फे समाजातील विविध घटकांना १५ ते ३५ % पर्यंत अनुदान मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षणातून उद्योगाचे धडे विभागात उद्योजगतेचे बीज रोवण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यामार्फत ८ ते १२ दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे. बीज मुद्रा योजनेत प्राथमिक कर्ज दिले जाते. ज्यामुळे लहान उद्योग सुरू करता येतात. उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करणारे जिल्हा उद्योग मित्र काम करतात. मैत्री पोर्टलच्या माध्यमातून परवाने आणि विविध सेवांसाठी ११९ सेवा उपलब्ध आहेत. हे सर्व उपाय योजनाबद्धपणे उद्योग वाढवण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आहेत, अशी माहिती यशवंते यांनी दिली. सिडबीच्या सर्वसमावेशक योजना सिडबीचे उपमहाव्यवस्थापक मनोज सहयोगी म्हणाले की सिडबीने उद्योगाच्या वित्तपुरवठ्यासाठी विशेष योजना तयार केलेल्या आहेत. नवीन उद्योगांसाठी तसेच विद्यमान उद्योगांच्या विस्तारासाठी कर्जे उपलब्ध आहेत. उद्योगांना आवश्यक असलेल्या यंत्रसामग्रीसाठी सिडबी डिजिटल कर्ज योजना प्रस्तावित करते. या अंतर्गत उद्योगांना तात्काळ आणि सुलभपणे कर्ज मिळवता येते, ज्यामुळे उत्पादन क्षमता वाढवणे शक्य होते. सिडबी ग्रीन फायनान्स योजनेंतर्गत पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी कर्ज उपलब्ध करून देते. या योजनेंतर्गत, नवीकरणीय ऊर्जा, ऊर्जा बचत, आणि इतर टिकाऊ उपाययोजनांना प्रोत्साहन दिले जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचा उद्देश सांगतांना सीए श्वेता भारतीया म्हणल्या या प्रकारच्या कार्यक्रमांचा उद्देश महिला उद्योजकांना सक्षमीकरण करणे आणि त्यांना स्पर्धात्मक बाजारात टिकून राहण्यासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध करणे आहे,” आम्ही स्थानिक उद्योजकांना समर्थन देण्यासाठी व त्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक संसाधनांपर्यंत पोहचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. सीएमआयए महिला सेल तर्फे आगामी काळात गुंतवणूक, निर्यात, आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रीला समोर ठेवून आणि मऱाठवाड्यात महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महिला सेलच्या प्रमुख उत्कर्षा पाटील यांनी सांगितले. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (सीएमआयए) ने महिला उद्योजक आणि एमएसएमईसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी सीएमआयए अध्यक्ष अर्पित सावे, मानद सचिव अथर्वेशराज नंदावत, महिला सेलच्या प्रमुख उत्कर्षा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment