१ जुलैपासून नॉन-एसी क्लास भाड्यात १ पैसा प्रति किमीने तर सर्व एसी क्लास भाड्यात प्रति किमी २ पैशांनी वाढ झाली. सोमवारी रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, लोकल ट्रेन आणि मासिक पास (एमएसटी) भाड्यात बदल झालेला नाही. नवीन भाडे फक्त १ जुलै २०२५ रोजी किंवा त्यानंतर बुक केलेल्या तिकिटांवर लागू होईल. सामान्य द्वितीय श्रेणीचे भाडे ५०० किमीपर्यंत वाढवण्यात आले नाही. यापेक्षा जास्त प्रवासाच्या तिकिटात प्रति किलोमीटर अर्धा पैसा वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच ५०१ ते १५०० किमीच्या प्रवासासाठी ५ रुपये जास्त द्यावे लागतील. स्लीपर क्लास आणि प्रथम श्रेणीच्या प्रवाशांनाही प्रति किलोमीटर अर्धा पैसे जास्त द्यावे लागतील.


By
mahahunt
1 July 2025