आमच्या सुखात मिठ कालवू नका, आम्हीच मिठागरे निर्माण करणारे:उद्धव ठाकरेंनी सरकारला सुनावले; कोळी बांधवांची घेतली भेट आमच्या सुखात मिठ कालवू नका, आम्हीच मिठागरे निर्माण करणारे:उद्धव ठाकरेंनी सरकारला सुनावले; कोळी बांधवांची घेतली भेट

आमच्या सुखात मिठ कालवू नका, आम्हीच मिठागरे निर्माण करणारे:उद्धव ठाकरेंनी सरकारला सुनावले; कोळी बांधवांची घेतली भेट

सरकारने आमच्या सुखात मिठ कालवू नये. कारण आम्हीच मिठागरे निर्माण करणारे असल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. कोळी बांधवांनी एकजुटीने राहावे. तुमच्यावर होणारा अन्याय सहन करू नका, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. मात्र, तो अन्यायच तोडून टाका, असे मी म्हणत असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले आहे. कोळी वाडा आणि विविध समस्यांसाठी आज कोळी बांधवांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या वेळी ते बोलत होते. कोळी बांधवांच्या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की, आणि गुण्यागोविंदाने राहणारे लोक आहोत. मात्र आमच्या सुखामध्ये मीठ घालण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही मिठागरे निर्माण करणारे लोक आहोत. सर्व कोळी बांधवांनी एकत्र व्हावे आणि एकजुटीने राहावे असे आवाहन देखील त्यांनी केले. सरकार आधी पिल्लू सोडून देते आणि अंगावर आले की झटकून टाकते. काही दिवस शांत बसायचे. मात्र, त्यांना जे करायचे ते तेच करत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आपला हा लढा अद्याप संपलेला नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *