पत्रकार चंद्रकांत साळुंके यांचे अपघाती निधन:नागापूर खुर्द येथे अंत्यसंस्कार

बीड तालुक्यातील नागापूर खुर्द येथील मुळ रहीवाशी बीड येथील पत्रकार चंद्रकांत साळुंके यांचे अपघाती निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ४४ वर्षे होते. बीड येथील पत्रकार चंद्रकांत साळुुंके हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गावाकडे जात असताना त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. अपघात एवढा भिषण होता की, प्रथम त्यांना बीड येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. अखेर मंगळवारी सकाळी 7च्या सुमारास घाटी रुग्णालयात उपचार चालु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. चंद्रकांत साळुंके यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्याच्यावर नागापूर खुर्द येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी गावातील सर्व नागरीक, अनेक पक्षाचे नेते,संपादक ,पत्रकार, डॉक्टर, वकील ,शिक्षक, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थीत होते.

  

Share