उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान:म्हणाले – मोदींनी सांगितल्यानुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले असेल, तर माझे उमेदवार मागे घेतो

सध्या राज्यात तीन-तीन भाऊ आहेत. एक देवा भाऊ, एक दाढी भाऊ आणि एक जॅकेट भाऊ. यांच्यात भाऊबंदकी झाली असली तरी एका बाबतीत त्यांच्यात एकमत झाले आहे. आपण तिघे भाऊ-भाऊ सगळे मिळून महाराष्ट्र घाऊ. हे तिघे भाऊ महाराष्ट्र गिळत आहेत. महाराष्ट्राला ओरबाडत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. अमरावती येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकुर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. मोदींनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले असेल, तर मी माझे उमेदवार मागे घेतो, असे आव्हानही त्यांनी दिले. उद्धव ठाकरे म्हणाले, एक काळ असा होता, आपण सगळे भाजपसोबत होते. 40 च्या वर खासदार आले होते. आणखी काय द्यायला हवे होते. खासदार दिले, आमदार दिले, खालची सत्ता दिली, वरची सत्ता दिली आणि त्यांच्या डोक्यात हवा गेली. मग, ती हवा काढायला नको. आता पुन्हा एकदा हवा काढून दाखवायची आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना केले. …त्यासाठी मला पाच वर्ष तरी पूर्ण करू द्यायची होती
गेली अडीच वर्षांची जखम घेऊन आपण वाट पाहत होतो. ती दिवस 20 तारखेला आलेला आहे. त्यांनी केवळ उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी नाही तर महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी केली आहे. आपले सरकार काय वाईट चालले होते. आधी पाच वर्ष पूर्ण करू द्यायचे असते. त्यानंतर मी किती आणि काय वाईट केले ते सांगायचे होते, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला. आपण तिघे भाऊ मिळून महाराष्ट्राल मिळून खाऊ
सध्या राज्यात तीन-तीन भाऊ आहेत. एक देवा भाऊ, एक दाढी भाऊ आणि एक जॅकेट भाऊ. यांच्यात भाऊबंदकी झाली असली तरी एका बाबतीत त्यांच्यात एकमत झाले आहे. आपण तिघे भाऊ-भाऊ सगळे मिळून महाराष्ट्र घाऊ. हे तिघे भाऊ महाराष्ट्र गिळत आहेत. महाराष्ट्राला ओरबाडत आहेत, अशी टीका ठाकरे यांनी केली. बहिणींना 1500 नाही तर सुरक्षेची गरज
आता या भावांना महिलांसाठी बहीण म्हणून प्रेम आले असेल पण त्यांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बदलापूर येथील घटनेचा उल्लेख केला. ते म्हणाले, काही महिन्यांपूर्वी बदलापूर येथे शाळेतील चिमुकल्या मुलींवर अत्याचार होतो, तर सुरक्षा कुठे आहे. त्या चिमुकलीच्या आईच्या तक्रारीची पोलिस ठाण्यात कुणी दखल घेत नसेल, तर त्या मातेने करायचे काय? तुमची पंधराशे रुपयांची मदत चाटायची का? असेही ठाकरे म्हणाले. या तिन्ही भावांनी त्या माऊलीकडे जाऊन तिला भेटावे. मी आहे तुझा भाऊ, हे घे पंधराशे रुपये असे तिला म्हणून बघा. ती माऊली पायतान काढून तुमचे तोंड फोडून काढेल. माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे, आणि तू मला लाच देतोस, असे ती माऊली म्हणेन. सुरक्षा नाही काही नाही, पण अचानकपणे मी तुझा भाऊ, हे घे मी तुला ओवाळणी देतो. असे नाटक, असे थोडांत महाराष्ट्रात आजपर्यंत कुणी केले नव्हते, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. …तर मी माझे उमेदवार मागे घेतो
शेतकऱ्यांचा उत्पादनाचा खर्च वाढला. पण त्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? एका तरी शेतकऱ्याने सांगावे की, मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे तुमचे उत्पन्न दुप्पट झाले, मी माझे उमेदवार मागे घेतो, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला दिले आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमी भाव मिळत नाही. महाविकास आघाडीच्या काळात दहा हजार रुपये भाव होता. पण आता भावाची उलटी गिनती सुरू झाली आहे. आता चार हजार, तीन हजार असा भाव पडत आहे, असा हल्लाबोल सरकारवर केला आहे. घरे पेटवणारे माझे हिंदुत्व नाही
भाजप जे म्हणेल ते हिंदुत्व मानायला मी तयार नाही. घरातील चूल पेटवणारे माझे हिंदुत्व आहे. घरे पेटवणारे माझे हिंदुत्व नाही. चांगले काम केले असते तर, जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचली असती, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

  

Share