आरोपीने मागितले अटक वाॅरंट अन् पोलिस तेच विसरले‎:फेक कॉलरच्या अटकेसाठी‎गेले अन् 30 तास ताटकळले‎

पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून ‎‎‘मशिदीत बॉम्ब आहे’ असा फेक‎कॉल करणाऱ्या तरुणाला अटक ‎‎करण्यासाठी गेलेल्या शहर‎‎पोलिसांना तब्बल‎‎३० तास पुण्यात ‎‎‎आरोपीच्या ‎‎‎फ्लॅटबाहेर‎‎ताटकळत‎‎बसण्याची वेळ ‎‎‎आली. घटनेच्या‎‎२३ दिवसांनी ‎‎पोलिसांना आरोपी निष्पन्न झाला. तो ‎‎पुण्यातील धनकवडी येथे असल्याने‎गुन्हे शाखेचे पथक त्यास अटक‎करण्यास गेले होते. त्या वेळी एमबीए‎झालेल्या आरोपीने दरवाजाच्या‎फटीतून पोलिस बघून अटक वॉरंटची‎मागणी केली. त्यामुळे पोलिसांची‎एकच गोची झाली. त्यानंतर गुन्हे‎शाखेस माहिती दिल्यावर बेगमपुरा‎पोलिसांनी सर्व सोपस्कार पूर्ण करून‎अटक वॉरंट आणत दीपक शाहूबा‎ढोके (४६, रा. शुभम पॅलेस,‎चैतन्यनगर, पुणे) यास अटक केली.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎तेव्हा अटक वॉरंट किती महत्त्वाचे‎असते हे पोलिसांना या घटनेवरून‎कळले, एवढे मात्र खरे.‎ नियंत्रण कक्षाच्या अंमलदार‎पार्वती मधुकर भोसले (३८) यांच्या‎फिर्यादीनुसार, ३१ मार्च रोजी‎सायंकाळी ६.५७ वाजता‎आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाच्या‎लँडलाइन क्रमांकावर एका अज्ञात‎मोबाइल क्रमांकावरून फोन आला.‎”विलास डोईफोडे बॉम्ब ब्लास्ट करने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎वाला है, मस्जिद में” असे सांगून‎फोन करणाऱ्या व्यक्तीने कॉल कट‎केला. त्यानंतर संपूर्ण पोलिस यंत्रणा‎शहरभर पाहणी करत होती. काही‎वेळाने हा कॉल फसवा असल्याचे‎पोलिसांना निष्पन्न झाले. त्या वेळी‎सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.‎मात्र यापुढे कुणीही असा फेक कॉल‎करून यंत्रणा वेठीस धरू नये यासाठी‎पोलिसांनी त्याचा शोध घेऊन ताब्यात‎घेतले.‎ आधी मुकुंदवाडीत‎ पोहोचले पथक‎ फोन आल्यानंतर दीपकने नाव‎घेतलेल्या विलास डोईफोडे याचा‎शोध घेण्यात आला. तो मुकुंदवाडी‎येथील निघाल्याने ३१ मार्च रोजी सर्व‎बॉम्बशोधक पथक त्याच्या घरी‎दाखल झाले होते. त्याच्या घराची‎पूर्ण तपासणी केल्यावर कुठलीही‎संशयास्पद गोष्ट आढळून आली‎नाही. त्यानंतर पुण्यातील दीपकच्या‎फ्लॅटची झाडाझडती घेतल्यावर‎काहीही आढळले‎ नाही. पोलिस‎तपासात दीपकने खोडसाळपणे हा‎कॉल केल्याचे कबूल केले आहे.‎ एमबीए पदवीधराला‎बायकोनेही सोडले‎ दीपक हा बी.एस्सी. व एमबीएचा‎पदवीधर आहे. त्यामुळे त्याला‎तंत्रज्ञान चांगले अवगत आहे. त्याने‎हॉक्स कॉलच्या मदतीने हा कॉल‎केला. त्यामुळे त्याचे लोकेशन‎दुसऱ्या देशातील दिसून येते.‎दीपकचे लोकेशन अमेरिकेतील‎दाखवत होते. मात्र शहर पोलिसांनी‎सायबर टीमच्या मदतीने हा आरोपी‎निष्पन्न केला. दीपक हा काहीसा‎विक्षिप्त असल्याची माहिती आहे.‎त्याचा २०१० साली विवाह झालेला‎असून त्याचा घटस्फोट झाला आहे.‎

  

Share