अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते प्रकाश भेंडे यांचे निधन:पोट्रेट काढण्याचा छंद देखील जोपासला; थोरला मुलगा आणि सूनही चित्रपटसृष्टीत कार्यरत

अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते अशा विविध अंगांनी ओळख मिळवणारे प्रकाश भेंडे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. चित्रपट क्षेत्राच्या पलीकडे जाऊन त्यांनी स्वतः आपला पोट्रेट काढण्याचा देखील छंद जोपासला होता. त्यासाठी आर्ट गॅलरीत आपल्या पोट्रेटचे प्रदर्शन देखील भरवले होते. प्रकाश भेंडे यांचे जन्म रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा येथे झाला होता. त्यांचे वडील डॉक्टर होते. मात्र प्रकाश भेंडे यांचे बालपण गिरगावात गेले. बालपणापासूनच विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी रंगमंचावर आपल्यातील कलागुणांचे प्रचिती दिली होती. त्यामुळेच त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. प्रकाश भेंडे यांच्या पश्च्यात मुले प्रसाद भेंडे आणि प्रसन्न भेंडे, सुना श्वेता महाडिक-भेंडे आणि किमया भेंडे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा थोरला मुलगा आणि सून हे चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांचे आठ वर्षांपूर्वीच निधन मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे या प्रकाश भेंडे यांच्या पत्नीचे आठ वर्षांपूर्वीच निधन झाले होते. उमा भेंडे यांनी 1960 साली ‘आकाशगंगा’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. मधुचंद्र, आम्ही जातो आमुच्या गावा, अंगाई, काका मला वाचवा, शेवटचा मालुसरा, मल्हारी मार्तंड, भालू, स्वयंवर झाले सीतेचे हे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट आहेत. त्यांनी मराठीसोबतच हिंदी, छत्तीसगढी आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले होते. प्रसाद प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर उमा आणि प्रकाश भेंडे यांच्या थोरल्या मुलाचे नाव प्रसाद भेंडे आहे. प्रसाद हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आहे. ‘दुनियादारी’ या सिनेमामुळे प्रसाद प्रसिद्धी झोतात आला. ‘दुनियादारी’ या सिनेमातून प्रसादचे सिनेमॅटोग्राफर म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील पदार्पण झाले. पहिल्याच सिनेमासाठी अनेक पुरस्कार आपल्या नावी केले. ‘दुनियादारी’नंतर ‘मितवा’, ‘लोकमान्य’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’, ‘वेलकम जिंदगी’, ‘पेइंग घोस्ट’ आणि इतर अशा बड्या सिनेमांसाठी त्याने सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले. ‘लोकमान्य’ सिनेमासाठी त्याने सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफरचा पुरस्कार मिळवला. ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’ हा आगामी सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मा आणि प्रकाश भेंडे यांनी प्रसादच्या जन्मानंतर श्री प्रसाद चित्र ही संस्था सुरू केली होती. या निर्मितीसंस्थेतून त्यांनी भालू, चटकचांदणी, आपण यांना पाहिलंत का, प्रेमासाठी वाट्टेल ते, आई थोर तुझे उपकार या चित्रपटांची निर्मिती केली होती.

  

Share