अदानी-फडणवीस यांची बंदद्वार चर्चा:धारावीनंतर मुंबईत ३६००० कोटींचा आणखी मोठा प्रकल्प मिळाला

उद्योगपती गौतम अदानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी रात्री उशिरा सागर बंगल्यात झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. धारावीनंतर गोरेगाव येथील मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी समूहाला मिळाले आहे. हा संपूर्ण प्रकल्प ३६ हजार कोटी रुपयांचा आहे. मात्र, राजकीय वर्तुळातील जाणकार सूत्रांच्या मते, धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि नवी मुंबई विमानतळ प्रकल्प हेदेखील दोघांमधील भेटीमागील मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. कारण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन १७ एप्रिल रोजी नियोजित होते, त्याचे वेळापत्रक आता पुढे ढकलण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन जूनमध्ये होईल, अशी घोषणा अदानी यांनी रविवारी केली.

  

Share