अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेला गालबोट:शिवराज राक्षेच्या पराभवानंतर झाला गोंधळ, पंचाला लाथ मारल्याचा प्रकार

अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात सामना झाला होता. यात शिवराज राक्षेचा पराभव झाला होता. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. पृथ्वीराज राक्षेने पंचाला लाथ मारल्याने हा प्रकार घडला आहे. पंचांचा निर्णय मान्य न झाल्याने शिवराज राक्षेने हे कृत्य केले. यावेळी दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापटही झाल्याचे दिसून आले. या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला. नंतर हे दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले. अहिल्यानगर येथे राज्य कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांतील विविध तालमीत प्रशिक्षण घेतलेले 860 मल्लांनी यात नोंदणी केली होती. महाराष्ट्र केसरी 2025 ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाला. पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ विजयी झाला, तर माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात सामना रंगणार होता. या लढतींमध्ये महेंद्र गायकवाड यांनी मैदान मारले. त्यानंतर महाराष्ट्र केसरी किताबासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना रंगला आहे. ही बातमी आम्ही अपडेट करत आहोत

  

Share