आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षेच संधी:मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देता येत नाही, अजित पवारांचे मोठे विधान

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा नागपुरात मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवार यांनी मंत्रिपदाबाबत मोठे वक्तव्य केले. आज शपथ घेणारे मंत्री यांचा कार्यकाळ ही अडीच वर्षांचा असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार म्हणाले. नागपूर येथील देशपांडे सभागृहात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांचा एक व्यक्ती एकत्र बसणार आहे. त्यानंतर, 2 महिन्यातच महामंडळ निवडी पार पडणार आहेत. मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देता येत नाही. कहीजणांना मागच्या वेळी दीड वर्षांची टर्म मिळाली, असे अजित पवारांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आम्ही आता ठरवले आहे, आता 5 वर्षात मंत्र्यांना अडीच-अडीच वर्षे टर्म देण्यात येणार आहे. आमचे देखील त्यावर एकमत झाले आहे. सध्या शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षाचा काळ मिळणार आहे, अशी घोषणाच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून केली आहे. मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले, लोकसभेला मी तटकरे साहेबांना म्हणायचो तटकरे साहेब तुम्ही तरी तुमची लोकसभेची जागा लढवा. जर अली नसती तर भोपळा मिळाला असता. तटकरे साहेब मला म्हणून शकत नव्हते तुमची जागा काढा म्हणून. मात्र, त्यांनी जागा काढली, आम्ही मात्र त्यानंतर खूप बदल केले. मी माझा स्वभाव बदलला. जबाबदारी आली की माणूस बदलतो. मी ठरवले आता कुणावर चिडायचे नाही. मी स्वभाव बदलला त्याचा परिणाम दिसला, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली आहे.

  

Share