राजस्थान विरोधी पक्षनेताप्रकरणी भाजपवर टीका:भाजपचे लोक दलितांना मंदिरात जाऊ देत नाहीत, कुणी गेला तर मंदिर धुतात- राहुल

गुजरातमधील पक्षाच्या ८४ व्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसने राजस्थानचे विरोधी पक्षनेते टिकाराम जुली यांच्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “राजस्थानमधील आमचे विरोधी नेते दलित आहेत.” ते रामनवमीला मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यानंतर भाजप नेते तिथे गेले आणि त्यांनी गंगाजल शिंपडले. हे लाजिरवाणे नाही का? जे दलित आहेत, मागासलेले आहेत तेदेखील मानव आहेत, तेदेखील हिंदू धर्माचे आहेत, बरोबर? जेव्हा विरोधी पक्षनेत्यासोबत असे केले जात असेल तेव्हा विचार करा, ग्रामीण भागात राहणाऱ्या दलितांची काय अवस्था असेल? लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, ‘भाजप दलितांना मंदिरात जाऊ देत नाही, जर कोणी गेले तर ते मंदिर धुतात.’ आपला धर्म सर्वांचा आदर करतो. हाच काँग्रेस आणि भाजपमध्ये फरक आहे. खरगे : जबाबदारी घ्या, नाही तर निवृत्त व्हा खरगेंनी खुल्या मंचावरून पक्षातील निष्क्रिय नेत्यांना इशारा दिला. ते म्हणाले, पक्षाच्या कामात योगदान देत नाहीत त्यांनी विश्रांती घ्यावी. जबाबदारी घेत नसाल तर निवृत्त झाले पाहिजे. जिल्हाध्यक्षांची नियुक्ती नि:पक्ष पद्धतीने केली जाईल. उमेदवार निवडीत त्यांची भूमिका असेल. जिल्हाध्यक्ष नियुक्तीपासून एका वर्षाच्या आत बूथ, मंडळ, ब्लॉक समिती स्थापन होईल.

Share