LOC जवळ घुसखोरीचा प्रयत्न, लष्करी अधिकारी जखमी:आठवडाभरात दुसरी घटना; बारामुल्ला येथे लष्कराने तीन दहशतवाद्यांचा केला खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचा एक अधिकारी जखमी झाला आहे. नौशेरा सेक्टरमधील कलाल भागात ही चकमक झाली. गेल्या आठवडाभरात घुसखोरीची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 9 सप्टेंबर रोजी या सेक्टरमधील लाम भागात नियंत्रण रेषेजवळ दोन सशस्त्र दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. दुसरीकडे, बारामुल्लामध्ये लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. काल किश्तवाडमध्ये दोन जवान शहीद झाले होते. तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. दोन्ही ठिकाणी लष्कर आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू आहे. किश्तवाड-बारामुल्ला येथील चकमकीची छायाचित्रे… कठुआमध्ये दोन दहशतवादी ठार, शस्त्रे जप्त
याआधी कठुआच्या खंडारामध्येही लष्कराचे ऑपरेशन झाले होते. येथे रायझिंग स्टार कॉर्प्सच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराने एक्सवरील पोस्टद्वारे ही माहिती दिली. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment