आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धा:मुलींच्या गटात संभाजीनगरला विजेतेपद, मुंबई ठरला उपविजेता

महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटना व छत्रपती संभाजीनगर जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या संयुक्त विद्यमाने अायाेजित ५८ व्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात यजमान छत्रपती संभाजीनगरच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मुंबईचा संघ उपविजेता ठरला. यजमान खेळाडू सिद्धी हत्तेकरने सुवर्णपदकाचा डबल धमाका केला. तिची बहीण रिद्धीने (१०.९४ गुण) एक सुवर्ण जिंकले. विद्यापीठ परिसरातील साई केंद्रात सुरू असलेल्या स्पर्धेत टेबल व्हाॅल्ट या प्रकारात सिद्धी हत्तेकरने सुवर्ण तर अनइव्हन बार्स व फ्लोअर एक्सरसाईज प्रकारात रौप्यपदक आपल्या नावे केले. मुंबई उपनगरच्या अनुष्का पाटीलने टेबल व्हॉल्ट प्रकारात रौप्य व बॅलन्सिंग बीममध्ये सुवर्णपदक पटकावले. तिच्या पाठोपाठ पुण्याच्या शताक्षी टक्केने बॅलन्सिंग बीमवर रौप्य व फ्लोअर एक्सरसाईजवर कांस्यपदक मिळवले. संभाजीनगरच्या रिद्धी हत्तेकरने फ्लोअर एक्सरसाईजवर सुवर्ण व टेबल व्हाॅल्ट या प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. या सर्वांमध्ये मुंबई उपनगरच्या इशिता रेवाळेने अनइव्हन बार्सवर सादरीकरणात जास्त गुण घेऊन सुवर्णपदक आपल्या नावे केले.

  

Share