भाजपचे जुने प्लॅन अंमलात आणण्यासाठी बाबासाहेब अडसर:शहांच्या वक्तव्यातून जुनी मानिकता बाहेर पडली, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला घेरले आहे. त्यांनी संघ, भाजप अन् अमित शाह यांच्यावर घणाघाती टीका केली. भाजप आणि संघाचे जे काही जुने प्लॅन आहेत ते आता अंमलात आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर अडकर आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. अमित शहा यांनी बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या विधानामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून भाजपवर टीका केली जात आहे. अमित शहा यांच्या वक्तव्यावरून भाजपला बाबासाहेबांचा द्वेष असल्याचे सिद्ध झाल्याचे विरोधक म्हणत आहेत. त्यात आता प्रकाश आंबेडकर यांनीही भाजपवर हल्लाबोल केला आहे. काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
भाजपचे जुने प्लॅन अंमलात आणण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्ष अडसर नसून बाबासाहेब आहेत. त्यामुळेच त्यांचा जळफळाट होत आहे. तोच जळफळाट त्यांच्या वक्तव्यातून बाहेर आला, अशी जहरी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली. भाजप आता जन्माला आला आहे. त्यांच्या आधी जनसंघ होता. त्याच्या आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होते. घटनेच्या कालखंडामध्ये सर्वात मोठा विरोध बाबासाहेबांना कोणी केला असेल, तर तो या संघटनेने केला, असा दावाही प्रकाश आंबेडकरांनी केला. लोकसभेत अमित शाह यांनी जे वक्तव्य केले, त्यातून त्यांची जुनी मानसिकता बाहेर पडली, असेही ते म्हणाले. बांगलादेशच्या नाड्या आवळणे गरजेचे
प्रकाश आंबेडकर यांनी बांगलादेशात होत असलेल्या हिंदुंवरील अत्याचाराबाबातही भाष्य केले. बांगलादेशच्या नाड्या आवळणे गरजेचे आहे. केंद्रात तुमची सत्ता आहे. त्यामुळे आपण त्यांना वीज देत आहोत, ती बंद करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केंद्र सरकारला केले. एकदा नियंत्रण सुटल की खालपर्यंत नियंत्रण सुटते, असेही ते म्हणाले. हे ही वाचा… काँग्रेस म्हणाली – संविधान हा ग्रंथ आणि आंबेडकर देव:मोदी म्हणाले- नेहरूंनी बाबासाहेबांच्या विरोधात प्रचार केला, काँग्रेसने भारतरत्न दिला नाही अमित शहा यांनी संसदेत आंबेडकरांबाबत केलेल्या टिप्पणीबाबत काँग्रेसने म्हटले की, शहा यांनी आंबेडकरांचा अपमान केला. काँग्रेस खासदार कुमारी सेलजा म्हणाल्या की, संविधान हा ग्रंथ तर आंबेडकर हेच देव आहेत. काँग्रेसने शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचा… अमित शहांचे वक्तव्य हे सकारात्मक:वक्तव्याचा विपर्यास केला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संपूर्ण देशाला आदर- अशोक चव्हाण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य हे सकारात्मक आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संपूर्ण देशाला आदर आहे. शहाच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे म्हणत भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी शहांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. सविस्तर वाचा…

  

Share