बीडच्या विनयभंग प्रकरणातील आरोपीसोबत धनंजय मुंडेंचे फोटो:आरोपी संदीप क्षीरसागरसोबत होते, मुंडेंचा दावा; खासदार बजरंग सोनावणेंचीही उडी बीडच्या विनयभंग प्रकरणातील आरोपीसोबत धनंजय मुंडेंचे फोटो:आरोपी संदीप क्षीरसागरसोबत होते, मुंडेंचा दावा; खासदार बजरंग सोनावणेंचीही उडी

बीडच्या विनयभंग प्रकरणातील आरोपीसोबत धनंजय मुंडेंचे फोटो:आरोपी संदीप क्षीरसागरसोबत होते, मुंडेंचा दावा; खासदार बजरंग सोनावणेंचीही उडी

बीड शहरातील खासगी कोचिंग क्लासेसमध्ये ‘नीट’ची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड व लैंगिक छळ करण्यात आला. या प्रकरणी दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशी त्यांची नावे आहेत. परंतु, यावरून आता बीडमधील राजकारण तापत असल्याचे दिसत आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केले आहेत. आमदार संदीप क्षीरसागर हे आरोपी सोबत होते- धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर पत्रकारांशी बोलताना संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केले आहेत. ते म्हणाले, आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर हे आरोपी सोबत होते. त्यांचे सीडीआर काढा आणि एसआयटी मार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी आपण केली असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली. प्रस्तुत प्रकरणात अनेक धागेदोरे आहेत. किती वाजता कोण कुठे होता? व फोन कसे गेले? हे तपासून पहावे लागेल. हे प्रकरण सीडीआर चेक करण्याइतपत आता राहिले नाही. या प्रकरणी सीडीआर प्लस आयपीडीआर चेक करावे लागतील. त्यानंतरच खरा गुन्हेगार व त्याच्यावर वरदहस्त असणाऱ्या गुन्हेगारांचा चेहरा पुढे येईल, असे धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडेंचे आरोपी सोबत फोटो व्हायरल या पत्रकार परिषदेनंतर आता धनंजय मुंडे यांचेच फोटो आरोपी विजय पवारसोबत व्हायरल झाले आहेत. खासदार बजरंग सोनावणे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केले आहेत. परंतु, आरोप करणे सोपे आहे ते सिद्ध होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया सोनावणे यांनी दिली आहे. खासदार बजरंग सोनावणेंचा खोचल टोला संतोष देशमुख खून प्रकरणात जे बोलत होते, ते विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणात गप्प का आहेत? त्यांना लाज वाटत नाही का? असा संतप्त सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला होता. त्याला बजरंग सोनावणे यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, आम्हाला लाज वाटली म्हणून आम्ही पहिल्या दिवशी बोललो होतो. मात्र, जे चार दिवसांनी बोलले, त्यांनाच लाज वाटली की नाही हे मला कळले, असा खोचक टोला लगावला आहे. महिला आयोगाकडून दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी घटना घडली त्या क्लासचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने ताब्यात घेऊन आरोपींना अटक होईपर्यंत क्लासची इमारत सील करावी व या क्लासमधील इतर विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन अजून अशा तक्रारी असल्यास त्याचा संवेदनशीलतेने तपास करावा, असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *