भंडारा शहरातील मुस्लिम लायबरी चौकात दोघांचा खून करण्यात आला आहे. अज्ञात लोकांनी येऊन मुस्लिम लायबरी चौकात उभ्या असलेल्या टिंकू खान, शशांक गजभिये यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात शशांक गजभिये याचा जागीच मृत्यू झाला, तर टिंकू खान याला रुग्णालयात नेत असताना त्याचाही मृत्यू झाला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भंडारा शहरात डबल मर्डर झाल्याने जागोजागी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पूर्व वैमनस्यातून हा खून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पाहा घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडिओ…