भास्कर ग्राउंड रिपोर्ट:उत्तराखंड दुर्घटना, धरालीमध्ये 150 जण गाळात दबल्याची भीती, 5 मृतदेह सापडले, शोधकार्य सुरू

धराली ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहे. आसपास ना रस्ता उरला, ना बाजार. नजर जाईल तिकडे २० फुटांचा ढिगारा आणि काळीज चिरत जाणारी शांतता. जेसीबीसारख्या मोठ्या मशीनही ३६ तासांनंतरही पोहोचू शकल्या नाहीत. लष्कराचे जवान हातातील मोठमोठ्या साधनांनी ढिगाऱ्याखाली जीव शोधत आहेत. १५० हून जास्त लोक येथे दबल्याची भीती आहे. कारण पूर आला तेव्हा गावातील सर्व ज्येष्ठ ३०० मी. दूर पूर्वजांच्या मंदिरात सामूहिक पूजेसाठी गेले होते. ते सर्व वाचले. मात्र गावातील बहुतांश युवा, व्यावसायिक आणि पर्यटक जलप्रलयाच्या तडाख्यात सापडले. हे सांगता-सांगता ३७ वर्षीय भूपेंद्र पवार फोनवरच रडू लागले. जलप्रलयातून वाचलेल्या नशीबवान लोकांपैकी ते एक. भास्कर टीम धरालीहून ६० किमी दूर भटवारीत आहे. येथून पुढे रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे प्रशासकीय आणि बचाव पथके बुधवारीही पुढे जाऊ शकली नाहीत. भास्करने येथून भूपेंद्रशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, जलप्रलय झाला तेव्हा हॉटेलात काम करणारी २० नेपाळी मुले, जवळपास १०० पर्यटकांसह २०० लोक बाजारात होते. आरडाओरड ऐकून मी हॉटेल सोडून १०० मीटर पळालो. त्यावेळी माझ्यामागे ३०-४० लोक होते. त्यात माझा स्टाफही होता. तो अजूनही बेपत्ता आहे.बचाव मोहिम सैन्याच्या हाती … तात्पुरता पूल बनवणे सुरू, आज पोहोचू शकते मदत… धरालीत मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास जलप्रलय झाला. त्यानंतर लगेच हर्षिलमध्ये असलेल्या आयटीबीपी व सैन्याच्या जवानांनी मदत कार्य सुरू केले. मात्र घटनेनंतर ३६ तासानंतरही मोठ्या मशीन व अतिरिक्त मदत-बचाव तुकड्या धरालीत पोहोचू शकल्या नाहीत. कारण, धरालीपर्यंत ६० किमीत जवळपास ५ ठिकाणी रस्ता तुटला आहे. सर्व पथके भटवारीत अडकून पडली. सध्या सर्व जबाबदारी सैन्याकडे सुपूर्द केल्या. गंगोत्री राष्ट्रीय मार्गावर गंगनारीजवळचा पूलही वाहून गेला. येथे सेना तात्पुरात पूल बनवत आहे. तो गुरुवारी तयार होऊ शकतो. त्यानंतर मदत पोहोचण्यास सुरुवात होईल. दरम्यान, वायुसेनाही एमआय-१७ हेलिकॉप्टर, एएलएच एमके-३ एअरक्राफ्टसह बचाव कार्य सुरू करेल. एएन-३२ आणि सी-२९५ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टही आग्ऱ्याहून डेहराडूनला पोहोचले. ते गुरुवारी उड्डाण करू शकतात. ढगफुटी नाही… लटकलेल्या हिमनद्या (बर्फाचे मोठे थर) घसरल्याने २-३ तलाव फुटून जलप्रलय धरालीच्या श्रीखंड पर्वतातून खाली उतरलेल्या जलप्रलयाचे कारण ढगफुटी नव्हे, तर पर्वतावर ६ हजार मी. वर लटकलेल्या हिमनद्या होत.हवामान विभागाचे संचालक डॉ. बिक्रम सिंह के यांच्यानुसार मंगळवारी धरातील दिवसभर केवळ २.७ सेमी सर्वसाधारण पाऊस झाला. तरीही विनाश ओढवला. त्याचे कारण – श्रीखंड पर्वतावरील लटकणाऱ्या हिमनद्या असू शकतात. वरिष्ठ भूगर्भ वैज्ञानिक प्रो. डॉ. एसपी सती यांनी सांगितले की, ट्रान्स हिमायलात सातत्याने तापमान वाढत असल्याने वरच्या भागातील हिमनद्या वितळत आहे. पाऊस व आर्द्रतेमुळे हिमनद्याचा एका मोठा भाग कोसळून वरच्या भागातील २-३ तलावांना भेदत पुढे निघाला. त्यामुळे डोंगराचे तुकडे अतिवेगाने वाहून धरालीत पोहोचले. ढगफुटी झाली असती तर पुरात दगडांऐवजी पाणी जास्त असते. ही नैसर्गिक आपत्ती या पावसामुळे नव्हे तर भौगोलिक असंतुलन, जलवायु परिवर्तनाशीही निगडीत आहेत. पौडीत ढगफुटी, २ ठार; हिमाचलमध्ये ५०० जणांची सुटका… उत्तराखंडच्या पौडी जिल्ह्यातील बुरांसी गावात बुधवारी ढगफुटी झाली. त्यात दोन महिलांचा मृत्यू झाला. उत्तरकाशी, रुद्रप्रयागसह ६ जिल्ह्यांत गुरुवारीही पावासाचा रेड अलर्ट दिला आहे. केदारनाथ, मद्महेश्वर यात्रा दोन दिवस थांबवण्यात आली. ३६ तासांनंतरही रेस्क्यूत अडचणी उत्तरकाशीत अडकलेले महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित असल्याचे राज्य सरकारने बुधवारी सांगितले. तथापि, यात अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील १९ पैकी १६ जणांशी कोणताही संपर्क होऊ शकत नसल्याचे, सूत्रांनी सांगितले. राज्य आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटर (एसईओसी) ने सांगितले की नांदेड जिल्हा ११, संभाजीनगर १५, अहिल्यानगर १, मुंबई १, साेलापूर ४, तर जळगाव जिल्ह्यातील १९ आहेत. यापैकी तिघांशी संपर्क होऊ शकला. पर्यटकांच्या कुशलतेबाबत एसईओसीच्या ९३२१५८७१४३/०२२-२२०२७९९० / ०२२-२२७९४२२९ वर संपर्क साधता येईल. तसेच उत्तराखंड राज्य आपत्कालीन ऑपरेशन्स सेंटरशी ०१३५-२७१०३३४/८२१ वर संपर्क साधता येईल.
उत्तरकाशी। नैसर्गिक आपत्तीत उद्ध्वस्त झालेल्या उत्तराखंडमधील धराली गावात ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांची शोधमोहीम बुधवारीही सुरूच होती. सेना, आयटीबीपी आणि एनडीआरएफ जवानांना ५ मृतदेह सापडले. बेपत्ता लोकांमध्ये केरळचे २८ पर्यटकही आहेत. त्यांचा काहीच ठावठिकाणा नाही. १९० लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी धराली अन् हर्षिलची हवाई पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *