भेट संतबंधूंची, आभाळ आले भरून:संत ज्ञानेश्वर माऊली व संतश्रेष्ठ सोपान काका महाराजांच्या पालखीची भेट, भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू भेट संतबंधूंची, आभाळ आले भरून:संत ज्ञानेश्वर माऊली व संतश्रेष्ठ सोपान काका महाराजांच्या पालखीची भेट, भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू

भेट संतबंधूंची, आभाळ आले भरून:संत ज्ञानेश्वर माऊली व संतश्रेष्ठ सोपान काका महाराजांच्या पालखीची भेट, भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू

भेट संतबंधूंची, आभाळ आले भरून, पालखी त्या दोघांची आपल्या मार्ग निघाली.. या काव्यपंक्ती प्रमाणे कैवल्य साम्राज्य संत ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ सोपान काका महाराज या संत बंधूंच्या भेटीचा हृदय सोहळा गुरुवारी (दि. ३) दसूर (ता. माळशिरस) जवळ झाला. तोंडले येथील विसाव्यानंतर वारकऱ्यांना संत बंधूंच्या भेटीच्या सोहळ्याची आस लागली होती. भेटी सोहळ्याच्या दरम्यान आकाश ढगांची दाटी झाली, मधूनच पडणाऱ्या पावसाच्या सरी अशा प्रसन्न वातावरणात बंधू भेटीचा हृदय सोहळा पाहताना भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा बंधू ज्ञानदेवाच्या भेटीसाठी दसूर पाटीजवळ रस्त्याच्या उजवीकडील बाजूस ज्येष्ठ बंधू ज्ञानदादाची वाट पहात थांबला होता. त्या सोहळ्यातील वारकऱ्यांनी फुगड्या अन् भारुडांचे सादरीकरण करीत वारकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. याच दरम्यान अचानक पावसाला सुरवात झाली अन् सोहळ्यातील भाविक चिंब न्हाऊन निघाले. दुपारी पावणेचार वाजता माऊलींचा पालखी सोहळा बंधू भेटीसाठी दाखल झाला. माऊलीचा रस्त्याच्या डाव्या बाजूला येऊन थांबल्यामुळे सोपानकाकांचा सोहळा माऊलीच्या बाजूला गेला. दोन्ही संतबंधूंचा रथ एकमेकांच्या जवळ येताच, भाविकांनी ‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम…’ असा संतांच्या नावाचा जयघोष करीत टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी स्थानिक गावकऱ्यांनी जेसीबीतून फुलांची उधळण करीत बंधूभेटीच्या सोहळ्याचा उत्साह अधिक वाढविला. सुरवातीला संत सोपान काकांच्या सोहळ्यातील अश्वांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख योगी निरंजनदास, डॉ. भावार्थ देखणे, राजाभाऊ चोपदार यांनी संत सोपानकाका सोहळ्याचे प्रमुख अॅड. त्रिगुण गोसावी यांना मानाचा श्रीफळ दिला. त्यानंतर दोन्ही सोहळ्यातील मानकऱ्यांनी एकमेकांना श्रीफळ देत सस्नेह भेट घेतली. बंधू भेटीचा क्षण पाहण्यासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली. भेटीनंतर संत सोपान काकांचा सोहळा भंडीशेगावकडे मुक्कामी गेला. तर, माऊलींचा ही सोहळा याच मार्गाने पुढे गेला. असाही योगायोग.. सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी माऊलींचा पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवल्यानंतर तो सासवड येथे मुक्कामी असतो. त्याच दिवशी सासवड येथून संतश्रेष्ठ सोपान काका महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतो. अठरा दिवसांच्या प्रवासानंतर सोहळा सोपानकाकांचा सोहळा पंढरीत दाखल होतो. माऊलींचा सोहळा सासवड मुक्कामी असतो, त्याच दिवशी बंधू सोपानकाकांचा सोहळा पांढरीकडे प्रस्थान ठेवतो. त्या बंधूंची भेट पंढरपूर तालुक्याच्या उंबरठ्यावर होते. सोपानकाकांच्या सोहळ्यावर फुलांची आरास संत सोपानकाकांच्या महाराजांच्या पालखी रथास दररोज फुलांची आकर्षक सजावट करण्यात येते. बंधू भेटीचा सोहळा असल्याने पालखी रथाच्या दर्शनी भागात फुलांद्वारे ‘बंधूभेट’ असे आकर्षक पद्धतीने लिहिले होते.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *