भाजप उन्माद हत्तीसारखा वागतोय:हा उन्मादपणा संपवायचा आहे, निर्धार मेळाव्यातून अंबादास दानवेंचा हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाचा नाशिक येथे निर्धार मेळावा होत असून राज्यातील सर्वच शिवसैनिकांनी येथे हजेरी लावली आहे. यावेळी अंबादास दानवे व चंद्रकांत खैरे एकत्र दिसून आले. यावेळी बोलताना अंबादास दानवे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप उन्माद हत्तीसारखा वागत आहे, तो उन्मादपणा आपल्याला संपवायचा आहे, असे अंबादास दानवे म्हणाले आहेत. अंबादास दानवे म्हणाले, शिवसेनेची ताकद आपल्यालाच माहित नाही, मुंबईत आपले आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाला. आंदोलन का दाबले जात आहे, जेंव्हा त्याचा भडका उडणार असतो. भाजप उन्माद हत्तीसारखे वागत आहे, आपल्याला हा उन्मादपणा खत्म केला पाहिजे, असे म्हणत अंबादास दानवे यांनी भाजपवर हल्ल्बोल केला. आता, लबाडांनो पाणी द्या! हे आंदोलन आम्ही उद्यापासून एक महिना संभाजीनगरमध्ये करणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, 8 जून रोजी मराठवाड्याचा शिबीर करणार आहोत, 8 जिल्ह्याचे मिळून हे शिवसेना पक्षाचे हे शिबीर असणार आहे. आपले कसे होणार? शिंदेंचे लोक काय करतात, भाजपचे लोक बघा कसे करत आहेत, हे आपले लोक म्हणत आहेत. सत्ता येईल आणि जाईल संघटनेचे काम त्यासाठी आपण करत नाहीत. आपल्याला पक्षाचा विचार रुजवायचा आहे, हे काम संघटनेचे आहे. पुढे बोलताना दानवे म्हणाले, राहुल गांधी यांना सुद्धा खुशवंत सिंह या पत्रकारने सांगितले की, तुम्हाला संघटनेचे काम कसे असते जाणून घ्यायचे असेल तर महाराष्ट्रमध्ये जा आणि शिवसेना पक्षप्रमुख यांचे काम बघा. चंद्रकांत खैरेंना टोला अंबादास दानवे म्हणाले, आपले 40-50 आमदार जरी गेले असले तरी जाऊ द्या, मात्र संघर्ष करून आपण सत्तेत येऊ. काही काल बैठकीत सांगत होते 2 वर्षांपूर्वी आलेला माणूस आम्हाला आदेश देतो, आम्ही पक्षात 40 वर्षांपासून काम करतोय. पण, आता ही पक्षाची सिस्टम आहे, ती समजून घेतली पाहिजे, असे म्हणत नाव न घेता चंद्रकांत खैरेंना टोलाही लगावला.

  

Share