विरोधात गेल्यास पक्षाचे दरवाजे कायमचे बंद होतील:भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बंडखोरांना इशारा

या निवडणुकीत भाजपातही बंडखोरी झाली. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरूद्ध नाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अशा सर्व नाराजांची समजूत काढत अर्ज मागे घेण्यास सांगितले आहे. पक्षातील निष्ठावंत अर्ज मागे घेतील. पक्षाच्या विरोधात जावू नका, अन्यथा पक्षाचे दरवाजे कायमचे बंद होतील, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे माध्यमांशी बोलताना दिला. काँग्रेसचे लाडकी बहीण योजनेविरुद्ध कारस्थान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी महाराष्ट्रातील लाडकी बहीण, शेतकऱ्यांची वीज बिलमाफी या योजना चुकीच्या असून त्या सरकारला दिवाळखोरीकडे नेतील, असे विधान करून आपला महिला व शेतकरी विरोधी आकस उघड केला. इतकेच नव्हे, लाडकी बहीण योजनेविरुद्ध कारस्थानही जनतेसमोर आले, असा आरोप बावनकुळे यांनी केला. काँग्रेसचे कारस्थान आम्ही हाणून पाडू. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आणि भाऊ त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. मविआचे नेते भाऊबीजेच्या दिवशी महिलांचा अपमान करतात काँग्रेसने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमधील महिलांसाठी सुरू असलेल्या योजना बंद पाडल्या किंवा जाहीर करून त्या पूर्ण केलेल्या नाहीत. काँग्रेसने मतदारांची फसवणूक केली. महाविकास आघाडीचे नेते भाऊबीजेच्या दिवशी महिलांचा अपमान करीत असून, संजय राऊत याचे विधान महिलांचा अपमान करणारे आहे. महिलांचा अपमान करणाऱ्यांना महिलांनी चप्पल दाखविली पाहिजे, महिलांचा अपमान लाडक्या बहिणी कदापीही सहन करणार नाहीत. त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवतील, असेही बावनकुळे म्हणाले. राहुल गांधीचा खोटारडेपणा खोडून काढू! राहुल गांधी यांनी अमेरिकेत जावून भारतातील एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण संपविण्याची भाषा केली आहे. नाना पटोले हे त्यांचे समर्थन करतात. देशाला आरक्षणाची गरज नाही असे म्हणणाऱ्या राहूल गांधी यांना आम्ही जाब विचारू. मागासवर्गीयांची मते घेण्यासाठी राहुल गांधी नागपुरात येत असून त्यांचा खोटारडेपणा आम्ही खोडून काढणार आहोत. आव्हाडांचा सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न आव्हाड विकासाबद्दल बोलू शकत नाही. अडीच वर्षे जु्न्या घटनांवर बोलून सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गोपाळ शेट्टी यांचे संपूर्ण आयुष्य भाजपामध्ये गेले. ते उद्यापर्यंत निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या विकासाला साथ देतील. दादाराव केचे यांचे आभार मानतो.

  

Share