भाजपचे काम गडबडच असते, साधेसुधे नसते:राज्यात देशातून 90 हजार लोक आलेत, पंकजा मुंडेंचे तूफान भाषण
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची अहिल्यानगर येथील पाथर्डी विधानसभा मेतदारसंघात सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, भाजपचे काम गडबडच असते, साधे नसते, त्यामुळे राज्यात काय चालू आहे हे बघायला बाहेरचे सगळे आले आहेत, असे म्हणत त्यांनी जोरदार भाषण केले. पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी संवाद साधला. पंकजा मुंडे म्हणाल्या, महायुतीची सत्ता आणण्यासाठी आपल्या लेकीने योगदान दिले आहे. हे आपल्याला सांगायचे नाही का? त्यामुळे एक एक आमदार तिथे हात वर करायला हवा. त्यामुळे आपल्याला आमदार द्यावेच लागतील. 20 तारखेला कमळाच्या फुलासमोरचे बटन दाबून मोनिका राजळे यांना विजयी करा, असे आवाहन मुंडे यांनी केले. पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्यात काय चालू आहे हे बघायला संबंध देशातून लोक आलेत. संपूर्ण राज्यभर 90 हजार बुथ आहेत. त्या 90 हजार बुथवर 90 हजार लोक आले आहेत. भाजपचे काम गडबडच असते, साधे नाही. त्यामुळे ऑक्सिजन कमी झालाय. सगळे बघायला आलेत राज्यात काय चालले आहे ते. सगळे कव्हर करत आहेत, रेकॉर्ड करत आहेत. पुढे त्या म्हणाल्या, सर्वांनी सांगितले की पंकजा मुंडे यांची सभा पाहिजे. त्यामुळे मी आले. तुम्ही एकदा हेलिकॉप्टर बघायला या. मी त्याला म्हणले खालून खालूनच चालव, पडलो तर जास्त लागणार नाही, असा विनोदही पंकजा मुंडे यांनी यावेळी केला. पुढे गोपीनाथ मुंडे यांची आठवण सांगताना म्हणाल्या, ज्यांचा कोणी वाली नाही अशा वंचितांसाठी मुंडे साहेब राजकारणात आले. याच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी सांगितले, मला गडावरून कोण दिसतय, मला म्हणाले मला पंकजा दिसत आहे. काय करण्यासाठी म्हणाले, तुमची सेवा करण्यासाठी म्हणाले.