चंदीगडमध्ये स्फोट, घराचे दरवाजे तुटले:हातबॉम्बने हल्ला करून हल्लेखोर ऑटोमधून पळाले, जीवितहानी नाही
चंदीगडमधील सेक्टर 10 येथील एका घरावर ग्रेनेड हल्ला झाला आहे. येथे 3 अज्ञात लोकांनी घरावर ग्रेनेड फेकले. यानंतर झालेल्या स्फोटामुळे घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. ज्यांनी स्फोट घडवला ते एका ऑटोतून आले होते. घटनेनंतर ते त्याच ऑटोतून फरार झाले. स्फोटाची माहिती मिळताच चंदीगड पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. डीजीपी सुरेंद्र सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली आयजी राजकुमार, एसएसपी कंवरदीप कौर यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा घरी पोहोचला आहे. तपासासाठी बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. याशिवाय बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेल्या साहित्याचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. सेक्टर-10 मधील घर क्रमांक 575 मध्ये ही घटना घडली. घटनेच्या वेळी कुटुंबीय घरातच होते. आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत…