स्व. रमेशचंद्रजी अग्रवाल यांच्या ‎जन्मदिनानिमित्त आज रक्तदान शिबिर‎:छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 ठिकाणी आयोजन

दिवाळीच्या सुट्या अन् विधानसभा निवडणुकीमुळे शहरात रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासत आहे. यामुळे अनेकांना रक्तपेढीतून रक्तही मिळत नाही. दरम्यान, ३० नोव्हेंबर रोजी स्व. रमेशचंद्र अग्रवाल यांच्या ८० व्या जन्मदिनानिमित्त आयोजित प्रेरणादिनी शहरात ११ ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत.
सध्या रक्तपेढ्यांत रक्ताचा तुटवडा भासत असून रक्ताअभावी रोज ५ ते ७ रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर भास्कर समूहाचे प्रेरणास्थान स्व. रमेशचंद्र अग्रवाल यांच्या ८० व्या जन्मदिनानिमित्ताने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आपल्या जवळच्या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे. त्यामुळे गरजू रुग्णांवर उपचारासाठी रक्त उपलब्ध होऊ शकेल.

  

Share