भारत-ऑस्ट्रेलिया लष्कराचा पुण्यात संयुक्त सराव:ऑस्ट्राहिंद लष्करी सराव महत्त्वपूर्ण ठरणार – ब्रिगेडियर अमांडा विल्यमसन

दहशतवाद, मूलतत्त्ववाद, सायबर सुरक्षा या सारख्या समस्या जगभर वाढत आहेत. युरोप आणि मध्य पूर्वेच्या देशातील अस्थिरता वाढत आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात वाद सुरू झाला आहे. हिंद प्रशांत महासागर प्रदेशात भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांना समान समस्या भेडसावत आहेत. हिंद प्रशांत महासागर प्रदेशात स्थिरता, शांतता प्रस्थापित करून प्रगती करण्याच्या दृष्टीने ऑस्ट्राहिंद हा लष्करी सराव महत्त्वपूर्ण ठरणार आहे असे प्रतिपादन ऑस्ट्रेलिया लष्कराच्या ब्रिगेडियर अमांडा विल्यमसन यांनी शुक्रवारी पुण्यात केले. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसऱ्या ऑस्ट्राहिंद 2024 या लष्करी संयुक्त सरावाला आज पुण्यात औंध लष्करी तळावर सुरुवात झाली. २१ नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या संयुक्त सरावात भारत आणि ऑस्ट्रेलिया लष्करातील लाईट हॉर्स रेजिमेंट आणि भारतीय लष्कराच्या डोग्रा रेजिमेंटचे १२० जवान सहभागी झाले आहेत. भारतीय लष्कराचे ब्रिगेडियर संदीप सहारण यावेळी म्हणाले की, दोन्ही देशात पहिल्या महायुद्धापासून लष्करी सहकार्य आहे. तसच दोन्ही देशातील मैत्रीपूर्ण संबंधनबरोबर आर्थिक सहकार्य पण आहे. ऑस्ट्राहिंद सरावामुळे दोन्ही देशातील सहकार्याचा नवीन अध्याय सुरू होणार आहे. दोन आठवड्याच्या या संयुक्त सरावात तंत्रज्ञान देवाणघेवाण, समरिक कौशल्याचं आदानप्रदान, युद्ध कवायती तसेच दोन्ही लष्करात क्रिकेट सामना पण होणार आहे. ऑस्ट्राहिंद हा लष्करी सराव २०२२ मध्ये सुरू करण्यात आला. पहिला सराव राजस्थान तर २०२३ मध्ये पर्थ इथ पार पडला.

  

Share